Raigad News: आदिवासी बांधवांची एकी अन् गावातील उभी बाटली केली आडवी

ठाणे
Updated Nov 06, 2022 | 18:01 IST

Liquor ban in Raigad Kalmaje village: रायगड जिल्ह्यातील आदिवासी वाडीतील ग्रामस्थांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गावात दारूबंदी लागू करण्याचा निर्णय सर्व ग्रामस्थांनी मिळून घेतला आहे. 

थोडं पण कामाचं
  • कळमजे आदीवासी पाड्यातील ग्रामस्थांनी घेतला दारुबंदीचा निर्णय
  • ग्रामस्थांच्या निर्णयाचं सर्वच स्तरात होतंय कौतुक

Raigad News: दारु गाळणे आणि दारु पिणे यासाठी आदिवासी समाज बदनाम आहे. दारु पिल्यावर सतत भांडण, मार्‍यामाऱ्या करणे यामुळे हा समाज शिक्षण, नोकरी व्यवसाय आणि प्रगतीपासून दूर आहे. हे लक्षात घेऊन माणगाव तालुक्यातील कळमजे आदिवासी वाडीवरील ग्रामस्थांनी दारुबंदीचा निर्णय घेतला आहे. (Raigad tribal villagers ban liquor in a village in kalmaje mangaon watch video)

रायगड जिल्हा आदिवासी समाजाची लोकसंख्या अधिक येथील आदिवासी मच्छीमारी, मध काढणे, शेतावर मोलमजुरीचे काम करतो. त्याचबरोबर पारंपारिक पद्धतीने दारु पाडणारा हा समाज व्यसनाधिन आहे.  पुरुषांसोबत स्त्रिया आणि मुलांमध्ये देखील व्यसनाधिनता मोठ्या प्रमाणात पहायला मिळते. त्यामुळे हा समाज शिक्षण आणि सामाजिक प्रगतीपासून वंचीत राहिला.

माणगावमधील कळमजे आदिवासी वाडीवर आता हे चित्र बदलताना दिसत आहे. माणगावचे पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील यांच्या प्रयत्नाने हे शक्य झाले आहे. पाटील यांना वेळोवेळी आदिवासी वाडीला भेट देत, बैठका घेऊन आदिवासी पुरुषांसोबत महिलांचे प्रबोधन केले. ज्यामुळे येथील ग्रामस्थांचे मनप्रवर्तन झाले आहे. कायद्याने कारवाया करण्याऐवजी प्रबोधनाच्या माध्यमातून गुन्हे टाळण्याचा अनोखा प्रयत्न माणगाव पोलीस करताना दिसत आहेत. असं जर प्रबोधन केलं तर सगळे महाराष्ट्रातले आदिवासी व्यसन मुक्त होऊ शकतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी