I am not the traitor- ठाकरे गट बॅनर लावत म्हणाले... साहेब मी गद्दार नाही 

ठाणे
Updated Jan 24, 2023 | 18:38 IST

I am not the traitor शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंतीनिमित्ताने जागो-जागी त्यांना अभिनंदन केल्याचे बॅनर लावले होते. शिवसेनेत फूट पडून सहा महिने झाले आणि शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष सर्वाना पाहायला मिळत आहे. 

कल्याण :  शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंतीनिमित्ताने जागो-जागी त्यांना अभिनंदन केल्याचे बॅनर लावले होते. शिवसेनेत फूट पडून सहा महिने झाले आणि शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष सर्वाना पाहायला मिळत आहे. 

काय लिहलंय बॅनरवर
साहेब आम्ही गद्दार नाही ..गेलेल्या ४० गद्दारांना गाडून पुन्हा त्याच उमेदीने उभे राहू तेव्हाच तुम्हाला खऱ्या अर्थाने अभिवादन केले याचा समाधान आमच्यासारख्या शिवसैनिकाला होईल जय हिंद जय महाराष्ट्र. 

अधिक वाचा: कधी आहे माघी गणेश जयंती? माघी गणेश जयंती का साजरी करतात?

दोन्ही गट एकमेकांवर टीका करण्याची संधी काय सोडत नाही. तसेच कल्याण शहरात पालिका मुख्यालयासमोर ठाकरे गटाने " साहेब आम्ही गद्दार नाही" असा बॅनर लाऊन सगळ्याचे लक्ष वेधून घेत आहे. ठाकरे गट कल्याण शहर शाखेच्या वतीने बॅनर लाऊन शिंदे गटावर टीका केली होती. जसे बॅनर लागल्याचे माहिती महापालिका आणि पोलिसांनी कळाली तत्काळ बॅनर काढण्याची कारवाई केली होती. पोलिसांनी सांगितले की, " याप्रकरणी बॅनर लावणाऱ्या अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी