तारपा वादक भिकल्या धिंडा यांना मानाचा 'संगीत नाटक अकादमी' पुरस्कार जाहीर

ठाणे
Updated Dec 10, 2022 | 20:36 IST

sangeet natak akademi award संगीत नाटक अकादमीने शुक्रवारी सन २०२२ साठीचे पुरस्कार जाहीर केले. यामध्ये संगीत नाटक अकादमी फेलोशिप, संगीत नाटक अकादमी पुरस्कार तसेच उस्ताद बिस्मिला खान युवा पुरस्कारांचा समावेश आहे. यंदा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशातील ७५ वर्षांच्या पुढील कलाकारांना विशेष अमृत पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे

पालघर:  निसर्गाने मानवाला जीवन जगण्यासाठी कोणत्या ना कोणत्या कलेची अभूतपूर्व भेट दिली आहे. या कलेचा वापर कोणी करमणुकीसाठी करत, तर कोणी आपले पोट भरण्यासाठी करत असते, परंतु त्याहीपलीकडे जाऊन पालघर जिल्ह्यातील एका ८७ वर्षांच्या अवलिया आदिवासी कला-संस्कृतीचे जतन करण्याचे काम करत आहे. जव्हार तालुक्याच्या वळवंडा गावातील तारपा वादक भिकल्या धिंडा यांना संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार जाहीर झाला आहे. ('Sangeet Natak Akademi' award announced to tarpa player Bhiklya Dhinda)

अधिक वाचा : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांवर शाईफेक

संगीत नाटक अकादमी राष्ट्रीय संगीत, नृत्य आणि नाटक अकादमी नवी दिल्ली यांच्याकडून नुकतीच संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार २०२२ ची घोषणा करण्यात आली. यामध्ये भिकल्या धिंडा यांना संगीत नाटक अकादमीतर्फे अमृत पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. रोख रक्कम एक लाख रुपये, आणि ताम्रपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. 

अधिक वाचा : साहित्य संमेलनातही खोके, सुरज आणि गुवाहाटीचीच चर्चा ; उद्धव ठाकरेंनी साधला मोदींवर निशाणा..

संपूर्ण महाराष्ट्रात उत्कृष्ठ तारपा वादक म्हणून यांची ओळख आहे. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य हे आदिवासी संस्कृतीचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे तारपा वाद्य वाजवण्यासाठी खर्च केले आहे. आजपर्यंत आपलं आयुष्य आदिवासी संस्कृतीचे जतन आणि संवर्धनासाठी झटणाऱ्या भिकल्या धिंडा यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्वस्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी