आमदारकीचा राजीनामा देतो, जितेंद्र आव्हाडांचे ट्वीट

ठाणे
Updated Nov 14, 2022 | 15:20 IST

second case file against ncp mla jitendra awhad after that awhad announced his resignation as mla : जितेंद्र आव्हाड मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी ट्वीट करून राजीनाम्याची घोषणा केली आहे. आव्हाडांचा राजीनामा विधानसभाध्यक्ष किंवा त्यांच्या कार्यालयाकडे दाखल झालेला नाही.

थोडं पण कामाचं
  • आमदारकीचा राजीनामा देतो, जितेंद्र आव्हाडांचे ट्वीट
  • जितेंद्र आव्हाड मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार
  • 354 अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आव्हाडांनी केली राजीनाम्याची घोषणा

second case file against ncp mla jitendra awhad after that awhad announced his resignation as mla : पोलिसांनी माझ्या विरोधात 72 तासांच्या आत दुसरा खोटा गुन्हा नोंदविला आहे. आयपीसी 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पोलिसी अत्याचाराविरोधात लढण्यासाठी मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत; अशा स्वरुपाचे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

जितेंद्र आव्हाड मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी ट्वीट करून राजीनाम्याची घोषणा केली आहे. आव्हाडांचा राजीनामा विधानसभाध्यक्ष किंवा त्यांच्या कार्यालयाकडे दाखल झालेला नाही. यामुळे आव्हाडांनी केलेली घोषणा ही प्रत्यक्षात येणार की राजकीय स्टंट आहे यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

तानाजी सावंतांकडून 24 तासात 22 अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती, अर्ध्या रस्त्यातून माघारी परतले अधिकारी !

Crime News अल्पवयीन तरुणी बोलत नसल्याने तरुणाने केले धक्कादायक कृत्य

'हर हर महादेव' या मराठी चित्रपटात इतिहासाची तोडमोड केल्याचा दावा करत जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी आक्रमक पवित्रा घेतला. आव्हाडांच्या नेतृत्वात त्यांच्या समर्थकांनी ठाण्यात 'हर हर महादेव' या मराठी चित्रपटाचा शो बंद पाडला होता. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत अटकेची कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात जामीन मिळून 24 तास होण्याआधीच जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आयपीसी 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईबाबत संताप व्यक्त करत जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केले. ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी राजीनामा देत असल्याची घोषणा केली. 

याआधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल (रविवार 13 नोव्हेंबर 2022) ठाण्यात होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दोन प्रलंबित उड्डाणपुलांचे लोकार्पण करण्यात येणार होते. या लोकार्पण सोहळ्याला जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते-पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कळवा पुलाचे लोकार्पण केल्यानंतर ते मुंब्रा येथील वाय जंक्शन येथे रवाना झाले. मुंब्रा येथील उड्डाणपुलाचा हा सोहळा पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे हे डोंबिवलीच्या दिशेने रवाना झाले. मुख्यमंत्र्यांचा ताफा डोंबिवलीकडे रवाना होण्याआधी त्या ठिकाणी उपस्थित भाजप कार्यकर्त्या रिदा रशीद यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ जात असताना आव्हाड आणि रिदा हे आमने-सामने आले आले. यावेळी आव्हाडांनी त्यांना बाजूला केले आणि आपला मार्ग मोकळा करून पुढे निघून गेले. आव्हाड यांनी जाणीवपूर्वक मला अपमानित करण्यासाठी दोन्ही खांद्याला धरून 'काय मध्ये उभी आहे, चल बाजूला हो' असे म्हणत ढकलल्याचा आरोप करत रीदा रशीद यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात धाव घेत आव्हाडांविरोधात विनयभंगाच्या गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी