नगरसेवक फोडणाऱ्या गणेश नाईकांना शिंदे गटाचा इशारा

ठाणे
Updated Jul 20, 2022 | 19:29 IST

Eknath Shinde camp vs Ganesh Naik: गणेश नाईक यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केला त्यानंतर शिंदे गटाकडून नाईकांना इशारा देण्यात आला आहे. 

Vijay Caugule on Ganesh Naik: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे समर्थक असलेल्या नवी मुंबईतील माजी नगरसेवकांनी गणेश नाईक यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशामुळे शिंदे गटाला झटका बसला. त्यानंतर आता शिंदे गटाकडून गणेश नाईक यांना एक इशारा देण्यात आला आहे.  (Shinde camp warn Ganesh Naik)

नगरसेवकांचा भाजप प्रवेशावरून एकनाथ शिंदे गट संतप्त झाला आहे. नवी मुंबईत भाजप आणि एकनाथ शिंदे गटात राजकीय संघर्षाला सुरुवात झाली आहे. नवी मुंबईतील शिंदे गटातील विजय चौगुले यांनी गणेश नाईक यांना इशारा दिला आहे. विजय चौगुले यांनी म्हटलं, आमदार गणेश नाईकांनी  राजकीय अपरिपक्वता दाखवली. दोन्ही पक्ष एकत्र असताना शिंदे गटाचे नगरसेवक फोडणे अयोग्य आहे. माजी विरोधीपक्ष नेते विजय चौगुले यांनी नाईकांवर गंभीर आरोप केले. नाईकांनी वेळ पाहून प्रवेश द्यायला पाहिजे होता. आम्ही धक्के दिले तर नाईकांना भारी पडणार असंही विजय चौगुले यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी