Clash in Dombivli Shiv Sena Shakha: शिवसेनेच्या डोंबिवली येथील शाखेत जोरदार राडा झाल्याचं पहायला मिळालं. एकनाथ शिंदे यांचे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार वाद झाला. शिवसेनेच्या शाखेत हिंदुदृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आनंद दिघे, स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो लावण्यात आले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी शाखेतून खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटोज काढण्यात आले. (Shivsainik and Shinde group supporters clash in dombivli shiv sena shakha watch video)
त्यानंतर आज शिंदे गटाच्या समर्थकांनी शिवसेना शाखेत प्रवेश करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटोज लावले. याच मुद्द्यावरुन शिवसैनिक आक्रमक झाले आणि त्यानंतर शिवसैनिक अन् शिंदे समर्थकांमध्ये जोरदार वाद झाला.