देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा तर दुसरीकडे मूलभूत सुविधांचा अभाव, पालघरमध्ये उपचाराअभावी जुळ्या बालकांचा मृत्यू

ठाणे
Updated Aug 16, 2022 | 17:57 IST

Newborn twins died because of no medical facility in Palghar: पालघरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उपचाराअभावी जुळ्या बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

newborn twins died in palghar due to lack of facilities: मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे उपचाराअभावी आणि सोयी सुविधांच्या अभावामुळे दोन जुळ्या बालकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. एका बाजूला देशात आझादीचा अमृत महोत्सव साजरा होत असताना दुसऱ्या बाजूला मात्र ग्रामीण भागात आजही मूलभूत सुविधांचा बोजवारा उडालेला पाहायला मिळतो. गावाला जोडणारा मुख्य रस्ता नसल्याने वंदना बुधर या प्रसूती झालेल्या महिलेला मरण यातना सहन कराव्या लागल्या आहेत.

मोखाडा तालुक्यातील मर्कटवाडी येथील गरोदर माता वंदना बुधर यांनी 2 जुळ्या बाळांना जन्म दिला. मात्र दुर्दैवाने दोन्ही मुलं दगावली. वंदनाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करणं गरजेचं होते. 108 ला कॉल केला मात्र गावाला जोडणारा रस्ता नसल्याने 108 ही पोहचू शकली नाही. वंदनाच्या कुटुंबीयांनी डोलीचा आधार घेऊन वंदना यांना रुग्णालयात दाखल केलं. 

अधिक वाचा : Ajit Pawar: 'सत्ता आली म्हणजे मस्ती आली काय तुम्हाला?', अजित पवार प्रचंड संतापले

मुख्यरस्ता गाठण्यासाठी वंदना यांना डोलीत घेऊन कुटुंबियांना 3 किलोमीटरची पायपीट करावी लागली. त्यातही पायवाट जीवघेणी असल्याने वंदना यांच्या कुटुंबियांना मोठी कसरत करावी लागली. हा व्हिडीओ सध्या समोर आला असून ग्रामीण भागातील दाहक वास्तव पुन्हा एकदा उघड झालं आहे.

अधिक वाचा : विरोधकांनी दिली ही 13 कारणे आणि टाकला चहा पानावर बहिष्कार, सर्व कारणे वाचण्यासारखी

या दुर्देवी घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे या प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी अशा अनेक घटना अनेक पाड्यांमध्ये रस्ते उपलब्ध नसल्याने घडत आहेत. फक्त पालघरच नाही तर रत्नागिरीत गुहागर धनगरवाडी इथे ही अशा प्रश्नांना जनतेला सामोरं जावं लागत आहे. आपण या प्रश्नांकडे लक्ष देत प्राधान्याने सोडवाल ही अपेक्षा आहे.

पालघर जिल्हा मोखाड्यातील अतिदुर्गम बोटोशी गावातील मरकटवाडी येथील वंदना बुधर या गर्भवती महिलेला आरोग्य सेवा मिळवण्यासाठी 3km डोलीतून पायपीट करत दवाखाना गाठावा लागला. यावेळी वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध न झाल्याने बुधर यांच्या जुळ्या बालकांचा मृत्यू झाला हि घटना अतीव वेदनादायी आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी