कल्याण : राज्य उत्पादन शुल्क विभागाने कपड्याच्या नावाखाली बनावट विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. कल्याण-पडघा मार्गावरील एका गोदामात ही छापेमारी करण्यात आली. गोदामात उभ्या असलेल्या एका बीएमडब्ल्यू कारमधून बनावट विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. हा मद्यसाठा आणि आलिशान बीएमडब्ल्यू कार जप्त करण्यात आली असून दोन दारू माफियांना अटक करण्यात आली आहे. हनुमंत दत्तु ठाणगे (वय 62), संदीप रामचंद्र दावानी (वय 34) अशी अटक केलेल्या आरोपीचे नावे आहेत. तर बीएमडब्ल्यूचा मालक आणि दारू माफियांचा म्होरक्या दीपक जिआंद्रम जयसिंघानी हा फरार आहे.
अधिक वाचा : कार्तिकने केले 10 दिवसांचे सर्वात महागडे शूट
राज्य उत्पादन शुल्क, कल्याण विभागाच्या पथकासह भिवंडी आणि उल्हासनगर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, विभागाच्या संयुक्त कारवाई करत 22 जानेवारी रोजी त्या गोदामावर छापेमारी केली. या गोदामात साठा केलेले दमण व हरियाणा राज्य निर्मित तसेच महाराष्ट्र राज्यातील बनावट मद्याच्या साठ्याचे एकूण 266 बॉक्स जप्त करण्यात आले.