[VIDEO]: पालघरमध्ये एसटी बसला अपघात, १४ विद्यार्थी जखमी

ठाणे
Updated Aug 13, 2019 | 17:15 IST

ST bus accident: पालघर जिल्ह्यात एसटी बसला अपघात झाला आहे. या बसमध्ये ५० विद्यार्थी प्रवास करत होते. यापैकी १४ विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ST bus accident in Palghar
पालघरमध्ये एसटी बस अपघात  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • पालघर जिल्ह्यात एसटी बसला अपघात
  • एसटी बसमधून शाळा आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी करत होते प्रवास
  • अपघातात १४ विद्यार्थी जखमी
  • अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात केलं दाखल
  • जखमी विद्यार्थ्यांना वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार केलं दाखल

पालघर: महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसला मंगळवारी सकाळच्या सुमारास अपघात झाला. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात एसटी बसला अपघात झाला. या बसमध्ये शाळेचे ५० विद्यार्थी प्रवास करत होते त्यापैकी १४ विद्यार्थी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थांनी, पोलीस दाखल झाले. जखमी विद्यार्थ्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (१३ ऑगस्ट) सकाळी पालघर जिल्ह्यातील गावातून एसटी बस विद्यार्थ्यांना घेऊन वाडा तालुक्याच्या दिशेने निघाली होती. या बसमध्ये शाळेचे आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रवास करत होते. ही एसटी बस वाडा तालुक्यातील जांभूळपाडा येथे आली असता बसला अपघात झाला. एसटी बस चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही बस रस्त्यावरुन खाली उतरली.

बस रस्त्यावरुन खाली उतरली आणि झालेल्या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनी बसमधून सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढलं. या अपघातात बसमधील १४ विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी तात्काळ वाडा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या सर्व विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

स्कूल बसचा भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद

काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील एका शाळेच्या बसला अपघात झाल्याचा व्हिडिओ समोर आला होता. हा अपघात इतका भीषण होता की बसमधून प्रवास करणारी एक महिला कंडक्टर चक्क उडून दुसऱ्या बाजुला आली. ही संपूर्ण घटना बसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. बसमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे की, बस आपल्या मार्गाने जात आहे आणि त्याच दरम्यान एक भरधाव टेम्पो ट्रॅव्हलर येतो. हा टेम्पो ट्रॅव्हलर स्कूल बसला जोरदार धडक देतो. या अपघातामुळे स्कूल बसमधील विद्यार्थी आणि महिलेला जोरदार झटका बसला.

शाळेसाठी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

मुंबईतील काही विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दररोज जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचं समोर आलं होतं. मुंबईतील चुनाभट्टी येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत जाण्यासाठी मोडकळीस आलेल्या एका छोट्याशा जागेवरुन शाळेत प्रवेश करत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. मुंबई सारख्या महानगरात विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अशा प्रकारे जीव धोक्यात घालावा लागत आहे तर इतर भागात काय परिस्थिती असू शकते असा प्रश्न उपस्थित होत आहे. या भागात राहणाऱ्या स्थानिकांनी या प्रकरणी मनपावर आरोप केला आहे. मुंबई महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. विद्यार्थ्यांना पाठीवर दप्तर घेऊन जीवघेणा प्रवास करावा लागत आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिका एखाद्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...