ठाणे : राज्यातील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली सारख्या इतरही भागांत रस्ते खड्डेमय झाल्याचं पहायला मिळत आहे. रस्त्यांवर खड्डे की खड्ड्यांत रस्ते अशी स्थिती निर्माण झाली आहे. अशीच परिस्थिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याला लागून असलेल्या भिवंडीत दिसून येत आहे. भिवंडीतील एका बस चालकाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्या बस चालकाने मुख्यमंत्र्यांना खड्डे बुजवण्याची विनंती केली आहे.
व्हायरल व्हिडिओत दिसत आहे की, एक बस चालक गाडी चालवत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भिवंडीतील खड्डेमय रस्ता दाखवत आहे आणि हे खड्डे तात्काळ दुरुस्त करण्याची विनंती देखील करत आहे.