Play For Kid : ठाण्यात छडी लागे छम छम नाटकाचा रंगला प्रयोग 

ठाणे
Updated Nov 17, 2022 | 22:43 IST

Child Play : जगण्यासाठी श्वास घेणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच योग्य वयात मुलांना संस्काळ मिळणेही  तितकेच योग्य आहे. त्यासाठीच ठाण्यात छडी लागे छम छम या बालनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी १४ नोव्हेंबर रोजी बालदिनाचे औचित्य साधून डॉ. समीरा भारती यांच्या पालवी महिला मंडळातर्फे आयोजित मुक्तछंद नाट्यसंस्थेतर्फे प्रस्तुत या नाटकाचा प्रयोग ठाणे महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमोर साजरा करण्यात आला.

थोडं पण कामाचं
  • जगण्यासाठी श्वास घेणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच योग्य वयात मुलांना संस्काळ मिळणेही  तितकेच योग्य आहे.
  • त्यासाठीच ठाण्यात छडी लागे छम छम या बालनाट्याचे आयोजन करण्यात आले होते.
  • सोमवारी १४ नोव्हेंबर रोजी बालदिनाचे औचित्य साधून डॉ. समीरा भारती यांच्या पालवी महिला मंडळातर्फे आयोजित मुक्तछंद नाट्यसंस्थेतर्फे प्रस्तुत या नाटकाचा प्रयोग ठाणे महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमोर साजरा करण्यात आला.

Child Play : ठाणे : जगण्यासाठी श्वास घेणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच योग्य वयात मुलांना संस्काळ मिळणेही  तितकेच योग्य आहे. त्यासाठीच ठाण्यात छडी लागे छम छम या बालनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी १४ नोव्हेंबर रोजी बालदिनाचे औचित्य साधून डॉ. समीरा भारती यांच्या पालवी महिला मंडळातर्फे आयोजित मुक्तछंद नाट्यसंस्थेतर्फे प्रस्तुत या नाटकाचा प्रयोग ठाणे महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमोर साजरा करण्यात आला. (thane tmc school play for children on childrens day on technology)

या बालनाट्यात किशोरवयीन मुलांच्या शैक्षणिक, कौटुंबिक, भावनिक आणि मानसिक गुंतागुंत दाखवण्यात आली आहे. सध्या तंत्रज्ञानामुळे जग झपाट्याने बदलत आहे. आपले जगणे मोबाईलच्या चौकटीत अडक्त आहे. या काळात शिक्षणपद्धत बदलली आहे, मानसिकता बदलली आणि तसेच मुलांना समजवण्याची, समजून घेण्याची तसेच मुलांना कळत नकळत केलेल्या चुकांची शिक्षा देण्याच्या पद्धतीही बदलल्या आहेत. आजच्या या टेक्नॉसॅव्ही पिढीला कशा प्रकारचे समजवले पाहिजे याचा प्रत्यक्ष सादरीकरण छडी लागे छम छम या बालनाट्यातून दाखवण्यात आली आहे. १४ नोव्हेंबर रोजी देशभरात बालदिन साजरा होतो. त्यानिमित्ताने या नाटकाचे सादरीकरण झाले. या या नाटकाचे लेखन संदीप गचांडे यांनी केले असून सिद्धार्थ ठाकूर यांनी हे नाटक दिग्दर्शित केले आहे. डॉ. समीरा समीर भारती आयोजित सदरचे बालनाट्य पालवी महिला मंडळ आयोजित  व मुक्तछंद नाट्यसंस्था प्रस्तुत ठाणे महानागर पालिका शाळा क्रमांक १३०, लुईसवाडी, वागळे इस्टेट  ठाण्यात येथे सादर झाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी