पालघर: अपघाती (accident) मृत्यू झालेल्या व्यक्तीला आपल्याच कुटुंबातील बेपत्ता झालेला सदस्य समजून एका कुटुंबाने (family) अंत्यसंस्कार केले. मात्र, बेपत्ता व्यक्ती सापडल्याने या अंत्यसंस्कार (Funeral) केलेली व्यक्ती कोणी दुसरीच निघाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे पोलिसांसह कुटुंबियांचेही डोके चक्रावले आहे.
अधिक वाचा :चेहरा ग्लो करण्यास डाळिंब आहे भारी
रेल्वेची धडक लागून एका व्यक्ती मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा पंचनामा करत त्यांची ओळख पटवली आणि त्या मृतदेहाला संबंधित कुटुंबियांच्या ताब्यात दिले. मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर काही दिवसांनी परत तीच व्यक्ती जिवंत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांसह कुटुंबीय गोंधळात पडली आहेत. दरम्यान जिंवत असलेल्या व्यक्तीचे नाव रफीक शेख असल्याचं सांगितलं जात आहे., परंतु ज्या व्यक्तीवर रफीक समजून अंत्यसंस्कार झालेत ती व्यक्ती कोण या प्रश्नाचे उत्तर शेख कुटु्ंबियांसह पोलीसही शोधत आहेत.
अधिक वाचा : या सवयींमुळे होते कॅन्सरची लागण
याप्रकरणी अधिकच्या माहितीनुसार, बोईसर रेल्वे स्थानकावर 29 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजतादरम्यान इंटरसिटी एक्स्प्रेसची धडक लागल्याने एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर तारापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केले. या दरम्यान पालघर लोहमार्ग पोलिसांनी या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी तपास सुरू केला. याच अनुषंगाने या व्यक्तीची छायाचित्रे सोशल मीडियाद्वारे व्हायरल करण्यात आली.
अधिक वाचा : चांगली झोप येण्यासाठी झोपण्यापूर्वी खा ही फळे
या दरम्यान एका व्यक्तीने पोलीस ठाण्यात येऊन छायाचित्रांवरुन ओळख पटवून संबंधित मृत व्यक्ती आपला भाऊ रफीक हा असल्याचे पोलिसांना सांगितले. त्याने याबाबत कुटुंबियांना माहिती दिली. त्यांनीही तारापूर येथे जाऊन मृत व्यक्तीची ओळख पटवून हा आपल्याच कुटुंबातील सदस्य असल्याचे सांगितले. त्यानंतर मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे पालघर येथे आणण्यात आला. या दरम्यान रफिकची पत्नी केरळमध्ये असल्याने कुटुंबियांनी तिलाही बोलावून घेतले. तिने ओळख पटविल्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर पोलिसांनी मृतदेह
या कुटुंबाकडे सोपविला. त्यानंतर या कुटुंबाने मृतदेहावर विधीवत अंत्यसंस्कार केले.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेली छायाचित्रे आणि माहितीवरून बेपत्ता झालेला रफिक हा सकवार येथील मानव सेवा ट्रष्ट वृद्धाआश्रमात असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे संबंधित कुटुंबाला आश्चर्याचा धक्काच बसला. कुटुंबीयांनी तिथे जाऊन पाहिले असता आश्रमातील व्यक्ती रफीकच असल्याचे त्यांच्या लक्षात झाले. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. रफीक आणि अपघातात मृत्यू झालेली व्यक्ती यांच्या चेहऱ्यात साम्य असल्याने हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले.
कुटुंबाने रफीक समजून अंत्यसंस्कार केलेली ती अनोळखी व्यक्ती कोण, असा प्रश्न या प्रकारामुळे आता पोलिसांसह सर्वांनाच पडला आहे. संबंधित व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक नरेश रणधीर आणि पोलीस उपनिरीक्षक विश्वासराव मुडावदकर यांनी दिली.
रफीक शेख कर्करोगाने ग्रस्त असल्याने केरळमधून पालघर येथे नातेवाइकांकडे आला होता. त्यानंतर तो इकडे-तिकडे भटकत होता. या दरम्यान त्याला कोणीतरी आश्रमात नेऊन ठेवले होते. त्यानंतर कुटुंबियांचा त्याचाशी संपर्क होऊ शकला नाही. तो बेपत्ता झाल्याचे समजून कुटुंबियांनी त्याचा शोधही घेतला होता.