VIDEO: वज्रेश्वरी मंदिरात दरोडा, घटना सीसीटीव्हीत कैद

ठाणे
Updated May 11, 2019 | 14:38 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Vajreshwari Temple theft CCTV: भिवंडी येथे असलेल्या प्रसिद्ध वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात चोरीची घटना घडल्याचं समोर आलं आहे. चेहऱ्यावर कपडा बांधून आलेल्या चोरट्यांनी दानपेटीतील सात लाखांची रोकड लंपास केली आहे.

Vajreshwari temple thane robbed masked men
VIDEO: वज्रेश्वरी मंदिरात दरोडा, घटना सीसीटीव्हीत कैद  

ठाणे: महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात असलेल्या भिवंडीतील वज्रेश्वरी देवीचं मंदिर सर्वत्र प्रसिद्ध आहे. या मंदिरात देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविक नेहमीच गर्दी करत असतात. मात्र, शुक्रवारी सकाळी एक मंदिरातील दानपेट्या फोडून त्यातील रोकड चोरल्याचा समोर आलं आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास दरोडेखोरांनी चेहऱ्यावर कपडा बांधून मंदिरात प्रवेश केला तसेच सुरक्षारक्षकाला एका खांबाला बांधून ठेवलं. त्यानंतर दरोडेखोरांनी मंदिरातील दानपेटीतील रोकड लंपास केली. दरोडेखोरांचं हे कृत्य मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चार ते पाच दरोडेखोरांच्या टोळीने शुक्रवारी पहाटे तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास भिवंडीतील वज्रेश्वरी मंदिरात प्रवेश केला. मंदिराच्या सुरक्षारक्षकाला एका खांबाल बांधलं आणि त्यानंतर दरोडेखोरांनी मंदिरातील दानपेट्या फोडल्या. दरोडेखोरांनी दानपेटीतील सर्व पैसा गोण्यांमध्ये भरला आणि तेथून पळ काढला. दरोडेखोरांनी दानपेटीतील तब्बल सात लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची माहिती समोर येत आहे.

या घटनेनंतर गणेशपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. तर मंदिरातील दानपेट्या फोडून चोरट्यांनी रोकड लंपास केल्याने भाविक आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये प्रचंड राग असून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास सुरु केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच वज्रेश्वरी देवीची जत्रा पार पडली होती आणि त्याच दरम्यान भाविकांनी मोठ्या प्रमाणात वस्तूंचं दान, पैशांच्या स्वरुपात दान केलं होतं. चोरट्यांनी हेच लक्षात घेऊन मंदिरातील दानपेट्या फोडल्या असल्याचं बोललं जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
VIDEO: वज्रेश्वरी मंदिरात दरोडा, घटना सीसीटीव्हीत कैद Description: Vajreshwari Temple theft CCTV: भिवंडी येथे असलेल्या प्रसिद्ध वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात चोरीची घटना घडल्याचं समोर आलं आहे. चेहऱ्यावर कपडा बांधून आलेल्या चोरट्यांनी दानपेटीतील सात लाखांची रोकड लंपास केली आहे.
Loading...
Loading...
Loading...