उस्मानाबाद: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्या वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले असून राज्यभर विरोधक रस्त्यावर उतरले आहेत. शिवसेना (ठाकरे गट) सुद्धा आक्रमक होऊन राज्यभर आंदोलन करत आहे. उस्मानाबादमध्ये शिवसैनकांनी भगतसिंह कोश्यारी यांचे धोतर फेडणाऱ्याचे प्रतिकात्मक आंदोलन केले. (A unique protest was held in Osmanabad to pay off the governor's dhoti)
आज उस्माबाद शहर शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रतिकात्मक पुतलळ्याचे धोतर फेडत अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं आहे. त्यानंतर कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेदी यांच्या पुतळ्याला जोडे मारले.