पुणे: कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले मंगळवारी उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी अर्ज भरण्यासाठी आलेले अभिजीत बिचुकले पत्रकारांवर चांगलेच भडकले. पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील प्रश्न काय आहेत? किती लोकसंख्या असे विचारला असताच? बिचुकले यांनी अतिशय आक्रमक होत मला भारताची लोकसंख्या माहिती. कसब्याची नाही, असं उत्तर पत्रकारांना दिलं. पत्रकारांनी कसबा विधानसभा मतदारसंघातल्या विविध प्रश्न विचारले असता ते चांगलेच संतापले.