Bharat Jodo Yatra : कुठेतरी चुकतयं, हे बदलायला हवं!, भारत जोडो यात्रा बुलढाण्यात पोहोचली

Bharat jodo yatra : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 18 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता बुलढाणा जिल्ह्यात पोहोचली. त्यांची आज सायंकाळी पाच वाजता शेगावमध्ये सभा होणार आहे.

Bharat Jodo Yatra reached Buldhana
Bharat Jodo Yatra : कुठेतरी चुकतयं, हे बदलायला हवं!, भारत जोडो यात्रा बुलढाण्यात पोहोचली  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • भारत जोडो यात्रेचा बुलढाणा जिल्ह्यात प्रवेश
  • शेगाव येथे राहुल गांधींची जाहीर सभा
  • राहुल गांधी यांंच्या सावरकरांच्या बाबत केलेल्या वक्तव्यानंतर वाद

बुलढाणा : काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यात आहे. महाराष्ट्रातील यात्रेच्या 12व्या दिवशी शुक्रवारी सकाळी अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथून बुलढाण्यात जिल्ह्यात यात्रा पोहोचली. (Bharat Jodo Yatra reached Buldhana)

अधिक वाचा : राहुल गांधींमुळे महाविकास आघाडीत बिघाडी! शिवसेना परत भाजपकडे मैत्रीची साद घालणार का?

देशात जाती-धर्माच्या नावावर देशात राजकारण सुरू आहे. दुसरीकडे महागाई, बेरोजगारी विरुद्ध आवाज उठवला जात असताना विरोधी पक्षांना अडचणीत आणण्याचे काम सत्ताधारी पक्षाकडून केले जात आहे. प्रेम व एकतेचा संदेश देणारी खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो’ यात्रा महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रा प्रमाणे ऐतिहासिक ठरणार असल्याचा विश्वास यात्रेचे समन्वयक आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत आज राहुल गांधींसोबत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधीही दिसले. ही यात्रा बुलढाणा जिल्ह्यातील शेगावकडे निघणार आहे. काँग्रेसनेही आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केले आहे. आज तुषार गांधी भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्याचे काँग्रेसने सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी