मदरशांमध्ये महापुरुषांचे फोटो का नाहीत?

गावगाडा
Updated Sep 28, 2022 | 19:15 IST

bjp mla slams chhagan bhujbal : मदरशांमध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे फोटो का नाही यावर आक्षेप घ्यायला हवा असे भाजप आमदार गिरीश व्यास म्हणाले.

थोडं पण कामाचं
  • मदरशांमध्ये महापुरुषांचे फोटो का नाहीत?
  • मदरशांमध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे फोटो का नाही
  • आक्षेप घ्यायला हवा असे भाजप आमदार गिरीश व्यास म्हणाले

bjp mla slams chhagan bhujbal : शाळांमध्ये सर्व महापुरुषांचा सन्मान होतो. जर भुजबळांना शारदा सरस्वती यांच्या पूजेवर आक्षेप असेल तर मदरशांमध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे फोटो का नाही यावरही आक्षेप घ्यायला हवा असे भाजप आमदार गिरीश व्यास म्हणाले. याआधी शाळेत सरस्वती शारदेचे फोटो कशाला हवे असे वादग्रस्त वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले होते. शाळेत महापुरूषांचे फोटो लावले पाहिजे असेही भुजबळ म्हणाले होते. भुजबळ यांच्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. देशात अंधश्रद्धा वाढीला लागण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होत असल्याचा आरोप  छगन भुजबळ यांनी केला होता. भुजबळ यांच्या या वक्तव्याचा भाजप आमदार गिरीश व्यास यांनी समाचार घेतला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी