'मी निर्लज्ज आहे असे समजा, का म्हणाले उदय सामंत जाणून घ्या

आगामी काळात होत असलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेच्या घोषणेपूर्वी विकास कामाच्या उद्घाटनाचा व भूमीपुजनाची लगीनघाई सुरू केली आहे. कोकणातील सर्वच जिल्ह्यात उद्घाटनाच्या कार्यक्रमाची सध्या जोरात सुरुवात आहे. यासाठी भाजप व शिंदे गटाकडून कार्यक्रमांची चढाओढ लागली आहे. त्यामुळे या उद्घाटनाच्या कार्यक्रमांची सध्या जोरात चर्चा सुरू आहे. 

BJP's displeasure in front of Uday Samantha over creditism
'मी निर्लज्ज आहे असे समजा, का म्हणाले उदय सामंत जाणून घ्या  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • रत्नागिरीत भाजप आणि शिंदे गटात नाराजीनाट्य
  • चिपळूणमध्ये भाजप कार्यकर्त्यांची उघड नाराजी
  • उद्योगमंत्री उदय सामंतांना जावे लागले रोषाला सामोरे

रत्नागिरी (सचिन कांबळे) : शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून राज्यात सरकारमध्ये भाजप आणि शिंदे गटातील मंत्री खांद्याला खांदा लावून काम करतानाचे व्हीडिओ आणि फोटो आपण सर्वांनी पाहिले आहेत. दोन्ही पक्षातील नेते एकत्रितपणे काम करत आहेत, केमिस्ट्री उत्तम आहे असा एक संदेश देखील जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम करताना दिसत आहेत. पण हे सर्व सुरू असतानाच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भाजप आणि शिंदे गटातील वादाने डोके वर काढले आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. (BJP's displeasure in front of Uday Samantha over creditism)

अधिक वाचा : मुंबईकरांनो ऐकलं का! 15 दिवसांसाठी शहरात लागू होणार संचारबंदी, पण का? जाणून घ्या

 राज्यात सत्तांतरानंतर भाजप व शिंदे गटाने आपापले पदाधिकारी व कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी विविध विकासकामांचा धडाका लावला आहे. त्याचाच एक भाग म्हणून  राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्गागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपळूणमधील विविध विकास कामांच्या उद्धघाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.  मात्र, या कार्यक्रमात पालकमंत्री उदय सामंत यांना भाजप कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. मात्र, त्यात भाजपला स्थान नसल्याने साहजिकच नाराजीनाट्य रंगण्याची चिन्हे आहेत. 

अधिक वाचा : विदर्भातून सारस पक्षी नष्ट होण्याच्या मार्गावर, नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला चांगलेच सुनावले

चिपळूणमधील उक्ताड येथे विकासकामाचे उद्घाटन कार्यक्रमा होता. त्यास उदय सामंत उपस्थित होते. या उदघाटनावरून भाजपचे आमदार निलेश राणे यांचे समर्थक परिमल भोसले यांचा आणि सामंत यांच्यामध्ये वाद झाला. इतक्या घाईत उद्घाटन कार्यक्रम करायची काय गरज? आम्हाला आमच्या नेत्यांचे बॅनर देखील लावता आले नाहीत, असा प्रश्न भाजप पदाधिकाऱ्यांनी विचारला. यावर उद्योगमंत्र्यांनी उत्तर दिले 

काय म्हणाले उदय सामंत

मी आलो ते वाईट नाही ना झालं  ? म्हणत,माझा सत्कार नाही केला किंवा माझे बॅनर नाही लागले याबद्दल मला काही वाटत नाही.....मी निर्लज्ज आहे असे समजा.  असे म्हणत पालकमंत्री उदय सामंत यांनी स्थानिकांची समजूत काढत मी सर्व कामे करून द्यायलाच आलोय बोलून वेळ मारून नेली.

अधिक वाचा : Andheri Fire News : अंधेरी पश्चिम स्टेशन परिसरात भीषण आग; चार ते पाच दुकानं जळून खाक

 अशा श्रेयवादामुळे शिंदे गट-भाजप सरकारमध्ये वितुष्ट निर्माण होईल का, हा वाद या सरकारची डोकेदुखी ठरेल का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी