Buldhana is hit by rain again : बुलढाण्याला परतीच्या पावसाचा तडाखा बसला. जिल्ह्यात अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे खरिपाच्या पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला.
भारतात उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये 6 ऑक्टोबरपासून मुसळधार पावसाची शक्यता आहे. देशाच्या ईशान्येकडील आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये पुढील 3-4 दिवसांत मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.