Car and truck collide on Mumbai Goa highway, 10 killed : माणगावच्या रेपोली गावाजवळ मुंबई गोवा हाय वे वर कार आणि ट्रकची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 1 लहान मुलगा, 4 महिला आणि 5 पुरुषांचा समावेश आहे. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातामुळे मुंबई गोवा हाय वे वरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
ट्रक रस्त्याच्या विरूद्ध दिशेने येऊन इको कार वर धडकल्याने हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आणि इतर यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी जाऊन मदतकार्य केले. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. कारचा तर पार चेंदामेंदा झाला. अपघाताच्या ठिकाणीच 9 जणांचा मृत्यू झाला होता. गंभीर जखमी झालेल्या लहान मुलाचा उपचार सुरू असताना हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. यामुळे अपघातातील मृतांची संख्या 10 झाली.