Chitra Wagh Reaction On Chandrakant patil ink Case: मुंबई: भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी-चिंचवडमध्ये शाईफेक करण्यात आली. चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाई फेक घटनेवरून भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ संतापल्या आहेत. चित्रा वाघ यांनी या घटनेबाबत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. तसंच त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. महाराष्ट्रात झुंडशाही सुरू असल्याचं ही त्यांनी म्हटलं आहे.
आमचे नेते चंद्रकांत दादा यांनी तो शब्द अनावधानाने वापरला. चूक लक्षात आल्यावर दिलगिरीही व्यक्त केली तरीही त्यांच्यावर शाई फेक करण्यात आली हे चुकीचं" अशा शब्दात चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. चित्रा वाघ यांनी घटनेचा धिक्कार केला आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक हल्ला झाला.