Raigad News: कोंबड्यांची झुंज लावून लावला सट्टा, फायटर कोंबडे ताब्यात

गावगाडा
Updated Nov 05, 2022 | 13:29 IST

Raigad News: खोपोलीतल्या तेजस फार्म हाऊसवर हा सर्व प्रकार घडला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी फार्म हाऊसवर कारवाई केली आहे.

थोडं पण कामाचं
  • रायगडमध्ये ( Raigad) कोंबड्यांची झुंज (Fighting) लावल्याचा प्रकार घडला आहे.
  • कोंबड्यांची झुंज लावून त्यावर सट्टा लावल्याची माहिती समोर आली आहे.
  • खोपोलीतल्या तेजस फार्म हाऊसवर हा सर्व प्रकार घडला.

रायगड: Raigad Breaking: एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रायगडमध्ये ( Raigad) कोंबड्यांची झुंज (Fighting) लावल्याचा प्रकार घडला आहे. इतंकच नाही तर कोंबड्यांची झुंज लावून त्यावर सट्टा लावल्याची माहिती समोर आली आहे. रायगडमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. 

खोपोलीतल्या तेजस फार्म हाऊसवर हा सर्व प्रकार घडला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी फार्म हाऊसवर कारवाई केली आहे. 

अधिक वाचा-  Nawab Malik: नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ, लवकरच ईडी मालमत्तेवर आणणार टाच

या घटनेत फायटर कोंबड्यावर सट्टा लावण्याचा प्रकार समोर आला आहे.  कोंबड्यावर सट्टा लावण्याच्या खेळा प्रकरणी 40 ते 50 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. झुंज लावण्यासाठी आणलेले कोंबडेही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. 

खालापूर DYSP संजय शुक्ला आणि खोपोली पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी ही कारवाई केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी