''राजकारण्यांना देखील भविष्यात खेळातले डावपेच शिकावे लागतील'', धीरज देशमुख यांची शिंदे सरकारला कोपरखळी

गावगाडा
Updated Dec 12, 2022 | 14:09 IST

MLA Dhiraj Deshmukh: रायगड: सध्या राजकारणात देखील खो खो, आणि कबड्डीतले डावपेच शिकले पाहिजेत असं वक्तव्य काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख यांनी केलं आहे.

थोडं पण कामाचं
  • धीरज देशमुख यांनी शिंदे सरकारला टोला लगावला आहे.
  • सध्या राजकारणात देखील खो खो, आणि कबड्डीतले डावपेच शिकले पाहिजेत- धीरज देशमुख
  • सध्या विधीमंडळात देखील अशीच खेळी चालते, कधी कोण कोणाला खो देईल हे सांगता येत नाही- धीरज देशमुख

MLA Dhiraj Deshmukh: रायगड:  सध्या राजकारणात देखील खो खो, आणि कबड्डीतले डावपेच शिकले पाहिजेत असं वक्तव्य काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख यांनी केलं आहे. 

सध्या राजकारणात देखील खो खो, आणि कबड्डीतले डावपेच शिकले पाहिजेत. आता या डावपेचांची गरज आहे, असं सांगत सध्या विधीमंडळात देखील अशीच खेळी चालते, कधी कोण कोणाला खो देईल हे सांगता येत नाही, असा टोला धीरज देशमुख यांनी शिंदे सरकारला लगावला आहे.

अधिक वाचा-  VIRAL VIDEO: तरुणीचा डान्स पाहून आजोबा घायाळ, स्टेजसमोर पोहोचले अन्...

आता आधिवेशनाला बसने आणायचं, सकाळ दुपार संध्याकाळची सोय करायची आणि परत सुखरूप आपल्या मतदार संघात जाईल याची व्यवस्था करायची अशी पद्धत सुरू झाली असल्याची कोपरखळी धीरज देशमुख यांनी रायगडमध्ये बोलताना मारली.  ते रोहा येथे आयोजित राज्य अजिंक्य पद आणि निवड चाचणी खो खो स्पर्धेच्या समारोप प्रसंगी बोलत होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी