नवी दिल्ली: Devendra Fadnavis on Jitendra Awhad: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वादग्रस्त वक्तव्यावरून चांगलाच वाद पेटला आहे. या वादात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही उडी घेतलीय. देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे. केवळ लांगुलचालन करण्यासाठी जितेंद्र आव्हाड अशी विधानं करतायेत असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.