पवारसाहेबांचा आशीर्वाद घेतला, गृहमंत्रीपदाची जबाबदारी मोठी : दिलीप वळसे-पाटील

गावगाडा
Updated Apr 06, 2021 | 14:50 IST

महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी मोठी आहे. ती पार पाडायला नक्कीच आवडेल. आजच दुपारी गृहमंत्रीपदाचा चार्ज घेणार आहे

थोडं पण कामाचं

  • महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी मोठी आहे. ती पार पाडायला नक्कीच आवडेल.
  • आजच दुपारी गृहमंत्रीपदाचा चार्ज घेणार आहे
  • चार्ज घेण्यापूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे आशीर्वाद घेतल्याचे  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील सांगितले.

मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी मोठी आहे. ती पार पाडायला नक्कीच आवडेल. आजच दुपारी गृहमंत्रीपदाचा चार्ज घेणार आहे. त्यामुळे हा चार्ज घेण्यापूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे आशीर्वाद घेतल्याचे  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.  

राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपद देण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीकडून करण्यात आली. वळसे-पाटील यांनी अजून गृहमंत्रीपदाची अधिकृत सूत्रे स्वीकारली नाहीत. ते आज दुपारी 3 वाजता पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी आज शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक येथे जाऊन पवारांची भेट घेतली.

पवारांचा आशीर्वाद घेतला

मी पवार साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या घरी आलो होतो. त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन घेतले. तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली, असं वळसे-पाटील म्हणाले. गृहमंत्रीपदाची जबाबदारी मोठी आहे. ही जबाबदारी पार पाडायला आवडेल, असं सांगतानाच आज दुपारी 3 वाजता गृहमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालय (सीएमओ) च्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा पाठवला आणि दिलीप वळसे पाटील यांच्याकडे आता गृहखात्याचा कार्यभार असेल अशी माहिती दिली.

कामगार विभागाचे प्रभारी पाटील हे हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपवले तर उपमुख्यमंत्री अजित पवार उत्पादन शुल्क विभागाची देखभाल करतील. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी आयुक्त परम बीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची प्राथमिक चौकशी १५ दिवसांच्या आत सुरू करावी, अशी मागणी केंद्रीय उच्च न्यायालयाने सीबीआयला केली असता सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांची नियुक्ती झाली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी