Mahaparinirvan Din 2022: ''चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, हे बाबासाहेबांमुळेच होऊ शकलं'', उपमुख्यमंत्र्यांकडून महामानव डॉ. आंबेडकरांना अभिवादन

गावगाडा
Updated Dec 06, 2022 | 12:18 IST

Mahaparinirvan Din 2022: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 66 महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Din)आहे.

थोडं पण कामाचं
  • ''कोणामध्येही भेद करता येणार नाही असं संविधान''
  • ''चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, हे बाबासाहेबांमुळेच होऊ शकलं''
  • ''इंदू मिलमधील स्मारकारचं काम वेगाने सुरु''

मुंबई: Mahaparinirvan Din 2022: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 66 महापरिनिर्वाण दिन  (Mahaparinirvan Din)आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील दादरमधल्या चैत्यभूमी (Chaitybhoomi) इथे जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. या देशाची दशा आणि दिशा बदलण्याचं काम बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं असल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

अधिक वाचा-  Mahaparinirvan Din 2022 Images: डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी मराठी Messages, Images द्वारे या महापुरुषास करा विनम्र अभिवादन

दादरच्या इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम वेगानं सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, हे बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच झालं असल्याचंही देवेंद्र फडणवीस कार्यक्रमात म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी