रायगड: Pen Urban Bank: पेण अर्बन बँकेच्या (Pen Urban Bank) ठेवीदारांना दिलासा देणारी बातमी आहे. बँकेच्या मालमत्तांवरील आपला हक्क सोडण्याची तयारी ईडीने दाखवली आहे. लवकरच याबाबतची प्रक्रिया पूर्ण होणार असून त्यामुळे अनेक ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळणार असल्याची माहिती भाजप नेते माजी खासदार (BJP leader and former MP Kirit Somaiya) किरीट सोमय्या यांनी दिलीय.
आज पेण अर्बन बँकेचे प्रशासक, ठेवीदार, पोलीस, महसूल विभागाचे अधिकारी यांची बैठक घेऊन सोमय्या यांनी चर्चा केली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
अधिक वाचा- Crime News अल्पवयीन तरुणी बोलत नसल्याने तरुणाने केले धक्कादायक कृत्य
ठेवीदारांना न्याय मिळावा यासाठी केंद्र सरकार, आरबीआय आणि सहकार मंत्रालयाच्या वाटाघाटी सुरू आहेत. बँक लिक्वीडेशनमध्ये न जाता छोट्या ठेवीदारांना 1 लाख आणि मोठ्या ठेवीदारांना 5 लाख रुपये कसे मिळतील याचे प्रयत्न सुरू असल्याचं किरीट सोमय्यांनी सांगितलं.
हा खटला फास्टट्रॅकवर चालवला जावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सोमय्या यांनी म्हटलं आहे.