Eknath Shinde : ती 40 गावं कर्नाटकात विलीन होणार ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला दावा

गावगाडा
Updated Nov 24, 2022 | 14:11 IST

Maharashtra Karnataka Border : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ४० गावांवर कर्नाटक सरकारने दावा केला आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली असून या गावांची मागणी 2012 सालची असल्याचे सांगितले.

अहमदनगर : महाराष्ट्र कर्नाटक राज्याच्या सीमा प्रश्नावर गेली अनेक वर्षांपासून मतभेद आहेत. या दोन्ही राज्यांच्या सीमा भागात राहत असलेल्या मराठी भाषिक नागरिकांची महाराष्ट्रात सहभागी होण्याची मागणी गेली अनेक वर्षे होत नाही. त्यातच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील ४० गावे कर्नाटकात घेणारं असल्याचे भाष्य केले होते. 

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री शिंदे बोलतांना म्हणाले की, महाराष्ट्र - कर्नाटक सिमा वाद हा जुना आहे. या संदर्भात न्यायालयीन लढा सुरू आहे असं असलं तरी ही आमची जबाबदारी आहे. महाराष्ट्रातून एकही गाव बाहेर जाणारं नाही. 

या संदर्भात आमचे बैठका ही झाल्या आहे यामध्ये केंद्र सरकार देखील सकारात्मक भूमिका घेईल. परंतु संबंधित गावांमध्ये वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून कामे सुरू आहे. वेगवेगळे प्रकल्पा सुरू असून पाण्याविना किंवा कोणत्याही समस्येमुळे एक ही गाव बाहेर जाणार नाही ही आमची जबाबदारी आहे, असे स्पष्ट केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी