आमदार वडेट्टीवारांच्या गावात पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा

गावगाडा
Updated Aug 12, 2022 | 13:30 IST

Funeral procession through flood waters : आमदार विजय वडेट्टीवार यांची जन्मभूमी असलेल्या करंजी गावातून आझादी गौरव पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. त्याच गावात स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने गुडघाभर पाण्यातून एक अंत्ययात्रा न्यावी लागल्याचा संतापजनक प्रकार समोर आला.

थोडं पण कामाचं
  • आमदार वडेट्टीवारांच्या गावात पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा
  • स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने गुडघाभर पाण्यातून अंत्ययात्रा
  • गोंडपिंपरी तालुक्यातील करंजी गावातील घटना
  • धनंजय साखरकर

आमदार विजय वडेट्टीवार यांची जन्मभूमी असलेल्या करंजी गावातून आझादी गौरव पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. त्याच गावात स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने गुडघाभर पाण्यातून एक अंत्ययात्रा न्यावी लागल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. ( Funeral procession through flood waters )

काँग्रेसचे जिल्ह्यातील तीन आमदार आझादी गौरव यात्रेला हजर होते. त्यातील एक आमदार याच क्षेत्राचे प्रतिनिधित्व करतात. तिथे हा प्रकार घडल्याने ग्रामीण भाग अजूनही किती मागे आहे, हे दिसून आले. करंजी गावात स्मशानभूमीच्या मार्गावरील नाल्यावर पूल नाही. त्यामुळे पुराचे पाणी या कच्च्या रस्तावर पसरले आहे. अशातच गावात रवी आत्राम यांचा मृत्यू झाला. आत्राम यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लोकांना पुराच्या गुडघाभर पाण्यातून मार्ग काढावा लागला.

गोंडपिंपरी तालुक्यातील करंजी हे गाव विजय वडेट्टीवार यांचे जन्मगाव आहे. या गावाशी त्यांचे भावनिक नाते आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या आझादी गौरव यात्रेची सुरवात याच करंजी गावातून केली. यात्रेला दोन दिवस उलटत नाही तोच या गावात हे विदारक चित्र समोर आले. पाच हजार लोकसंख्या असलेल्या करंजी गावात स्मशानभूमीचे काम करण्यात आले.  मात्र मार्गावरील नाल्यावर पूल बांधण्याचे काम अजूनही झालेले नाही. या पुलासाठी अनेकदा मागणी झाली. ग्रामपंचायतेनेही मागणी रेटून मंत्री असताना वडेट्टीवार यांनीही याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे मृत्यूनंतरही इथल्या लोकांना वेदना सहन कराव्या लागत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी