Mahad Gas Leak: महाड एमआयडीसीमध्ये दुर्घटना, नेमकं काय झालं? वाचून हादरा बसेल...

गावगाडा
Updated Nov 15, 2022 | 11:34 IST

Raigad Accident : महाड MIDC मधील केमिकल कंपनीमध्ये सोमवारी मध्यरात्री वायु गळतीची घटना घडली. या दुर्घटनेत एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण गंभीर आहेत. या दुर्घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले. ग्रामस्थांनी कंपनीच्या गेटवर मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे.

थोडं पण कामाचं
  • महाड एमआयडीसीत वायु गळती
  • दुर्घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक
  • कंपनीची तोडफोड

रायगड (सचिन कांबळे) : महाड एमआयडीसीमधील प्रसोल कंपनीमध्ये सोमवारी रात्री वायुगळतीची घटना घडली. या दुर्घटनेत एकाचा कामगाराचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर आहेत. दरम्यान, या दुर्घटनेनंतर स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेत तोडफोड केली. (Gas leak in company in Mahad MIDC, one worker killed)

रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीतील केमिकल कंपनीमध्ये सोमवारी वायु गळती झाली. यात जितेंद्र हाडे (वय 40 रा. महाड) या कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर प्रशांत किंकले आणि मिलिंद मोरे हे दोघे गंभीर असून त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या दुर्घटनेनंतर स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेत कंपनीत जाऊन तोडफोड केली. स्थानिक कंपनीकडून मयत आणि जखमी कामगारांना नुकसान भरपाई द्यावी. तसेच कंपनी कायमस्वरुपी बंद करण्यात यावी, अशी मागणी केली. दरम्यान, कंपनी प्रशासन पळून गेल्याने एमआयडीसी परिसरात तणावाचे वातावरण आहे. महाड पोलिसांनी मध्यस्थी करून स्थानिकांची समजूत काढल्यानंतर वातावरण निवळले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी