बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यावर इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य!

गावगाडा
Pooja Vichare
Updated Feb 08, 2023 | 09:14 IST

Indurikar Maharaj: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेच्या विधिमंडळ नेते पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर काँग्रेसमधली गटबाजी चव्हाट्यावर आली.

maharaj indurikar comment on balasaheb thorat
बाळासाहेब थोरातांवर इंदुरीकर महाराजांची स्तुतीसुमने 

Indurikar Maharaj: अहमदनगर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेच्या विधिमंडळ नेते पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर काँग्रेसमधली गटबाजी चव्हाट्यावर आली. थोरातांच्या राजीनाम्यावर राज्यभरातून अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.अशातच प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (देशमुख) यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर सूचक मत व्यक्त केलं. ते मंगळवारी संगमनेरमध्ये  येथे थोरातांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कीर्तनात बोलत होते.

विविध अध्यामिक दाखले देताना इंदुरीकर म्हणाले, ‘देवपण येण्यासाठी मोठे कष्ट सोसावे लागतात. लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात हे सर्वमान्य नेतृत्व आहे. संगमनेर तालुका व जिल्ह्यासाठी हा आपला माणूस आपला स्वाभिमान आहे', असे इंदुरीकर महाराजांनी सांगितले. पुढे इंदुरीकर महाराज म्हणाले की, . क्षेत्र कोणतंही असो, आपला माणूस हा आपला स्वाभिमान असतो. बाळासाहेब थोरातांनाही एक वाक्य बरोबर लागू होतं ते म्हणजे, जे दगडं घाव सहन करतात तीच दगडं मूर्तीसाठी उपयोगी पडतात.”

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी