Kirit Somaiya । राऊतांच्या आरोपांमुळे आमच्यावर.., किरीट सोमय्यांनी केली ठाकरे सरकारच्या चौकशीची मागणी

Kirit Somaiya on Uddhav Thackeray : भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र निल सोमय्या यांच्यावर महाविकास आघाडी सरकारच्या काळात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात सोमय्या पती-पुत्रांना गायब व्हावे लागले होते.

Kirit Somaiya's serious allegations against the Thackeray government
राऊतांच्या आरोपांमुळे आमच्यावर.., किरीट सोमय्यांनी केली ठाकरे सरकारच्या चौकशीची मागणी   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • राज्यात भाजप विरुद्ध शिवसेना संघर्ष
  • सोमय्या पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल
  • शिवसेना खासदार संजय राऊत यांना नोटीस पाठवणार

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात वसई प्रकल्प निकॉन इन्फ्रा कंपनीबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या व निल सोमय्या यांच्यावर अनेक आरोप केले. त्यानंतर अटकेच्या भितीने पित्रा-पुत्रांना गायब व्हावे लागले. आता शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. (Kirit Somaiya's serious allegations against the Thackeray government)

अधिक वाचा : Bharat Jodo Yatra : कुठेतरी चुकतयं, हे बदलायला हवं!, भारत जोडो यात्रा बुलढाण्यात पोहोचली

किरीट सोमय्या म्हणाेल की, माझ्याविरोधात केलेल्या तक्रारीचा तक्रारदार बोगस आहे. दोन महिने तक्रारदाराला शोधतोय. त्याचा पत्ता बोगस, फोन नंबर बंद आहे. तक्रारदार जिवंत आहे की, नाही हे फक्त संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनाच माहित आहे, या प्रकरणात खोटेपणाशिवाय दुसरे काही नाही. त्यामुळे याप्रकरणाची चौकशी करावी. तसेच जे दोषी पोलीस अधिकारी त्यामध्ये आहेत. त्यांचे निलंबन करावे, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी