Kirit Somaiya । अनिल परबांच्या रिसॉर्टवर किरीट सोमय्यांनी मारला हातोडा, कडक बंदोबस्तात पाडण्याचे काम सुरू

गावगाडा
Updated Nov 22, 2022 | 18:20 IST

Ratnagiri : शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या मालकीचे मुरुड येथील समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या सी कॉच रिसॉर्ट पाडण्याचे काम सुरू करण्यात आले. यावेळी भाजपा नेते किरीट सोमय्या स्वत: हातोडा घेऊन पोहोचले होते.

थोडं पण कामाचं
  • अनिल परब यांचे साई रिसॉर्ट पाडण्यास सुरुवात
  • किरीट सोमय्याही दापोलीत दाखल
  • कडक बंदोबस्तामध्ये रिसाॅर्टचे बांधकाम पाडण्याचे काम सुरू

रत्नागिरी (सचिन कांबळे) : गेल्या काही महिन्यांपासून माजी मंत्री अनिल परब विरुद्ध भाजप नेते किरीट सोमय्या या वादाच्या केंद्रस्थानी असलेले दापोलीतले साई रिसॉर्ट आज पाडण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी स्वत: किरीट सोमय्या हातोडा घेऊन रिसाॅर्ट परिसरात आले होते. (Kirit Somayy hammered Dapoli's resort)

अधिक वाचा : Sanjay Raut: 'सरकार 100 टक्के पडणार, माझ्याकडे सगळी माहिती', राऊतांचा गौप्यस्फोट

शिवसेना नेते अनिल परब यांच्या मालकीचं हे रिसॉर्ट अनधिकृत असल्याचा आरोप माजी खासदार किरीट सोमय्यांनी केला होता. पर्यावरण विभागानं आखून दिलेल्या नियमांचं उल्लंघन करून समुद्रकिनारी हे रिसॉर्ट बांधण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.  यावर न्यायालयात रीतसर सुनावणी झाल्यानंतर अखेर आज दापोलीतील साई रिसॉर्टवर हातोडा पडला. यासाठी किरीट सोमय्याही हातात हातोडा घेऊन दापोलीत दाखल झाले.

सोमय्या प्रतिकात्मक हातोडा हातात घेऊन ते येथील रिसॉर्टवर  गेले. तिथे त्यांनी कामगारांसह रिसाॅर्ट पाडण्यासु सुरुवात केली. त्यामुळे शिवसैनिक व सोमैय्या यांच्यात वाद उफळण्याची चिन्ह दिसत असल्याने सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी