भाजप सरकारच्या निष्काळजीपणामुळे महाराष्ट्रात पूर परिस्थिती : अजित पवारांची भाजपा सरकारवर टीका 

गावगाडा
Updated Aug 09, 2019 | 17:08 IST | ऊमेर सय्यद

महाराष्ट्र राज्यात सांगली, सातारा, कोल्हापूर येथे जे परिस्थिती उद्भवली आहे ती फ़क्त भाजप सरकारच्या निष्काळजीपणामुळे आहे. आता पाणी डोक्यावर गेल्याने मुख्यमंत्र्याना जाग आली असल्याची अजित पवार यांनी टीका केली आहे

ajit pawar
सांगली-कोल्हापूरच्या पुराबाबत अजित पवारांनी शिर्डीत केली टीका  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • पूर परिस्थिती फक्त भाजप सरकारच्या निष्काळजीपणामुळे
  • महाराष्ट्रात उद्भवलेल्या परिस्थितीला फडणवीस आणि कर्नाटक मधील त्यांच्याच पक्षाची येडीयुरप्पा सरकार  जबाबदार
  • पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांचे पाणी अलमट्टी धरणात सोडले असते तर आज ही परिस्थीती उद्भवली नसती
  • महाराष्ट्रातील नद्यांचे पाणी पुढे सोडण्यासाठी 24 किंवा 48 तासाचा कालावधी लागतो

अहमदनगर : महाराष्ट्र राज्यात सांगली, सातारा, कोल्हापूर येथे जे परिस्थिती उद्भवली आहे ती फ़क्त भाजप सरकारच्या निष्काळजीपणामुळे आहे. आता पाणी डोक्यावर गेल्याने मुख्यमंत्र्याना जाग आली असल्याची सणसणीत टीका राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांनी केली आहे 

अजित पवार यांनी शिर्डी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते, अजित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस सरकारवर आरोप करत महाराष्ट्रात उद्भवलेल्या परिस्थितीला फडणवीस आणि कर्नाटक मधील त्यांच्याच पक्षाची येडीयुरप्पा सरकार  जबाबदार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे... 

अजित पवार यांच्या मते पूर परिस्थिती निर्माण होण्याआगोदर राज्य सरकारने सांगली कोल्हापूर येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्याची गरज होती, मात्र प्रत्यक्षात तस झाले नाही.

भरपूर प्रमाणात पाऊस झाल्याने महाराष्ट्रातील कृष्णा, पंचगंगा, वारणा या नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी असते आणि अशा परिस्थितीत या नद्यांचा पाणी महाराष्ट्र - कर्नाटकाच्या बॉर्डरवर असलेल्या अलमट्टी धरणामध्ये सोडण्याची गरज होती. मात्र भाजपाचे मुख्यमंत्री फडणवीस आणि  भाजपाचे कर्नाटकातील मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या निष्काळजीपणामुळे आज महाराष्ट्रात ही परिस्थिती निर्माण झाली आहे. 

पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांचे पाणी अलमट्टी धरणात सोडले असते तर आज ही परिस्थीती उद्भवली नसती, परंतु या घटनेला जेवढे महाराष्ट्र राज्यातील फडणवीस सरकार जबाबदार आहे, तेवढेच जबाबदार कर्नाटकातील येडीयुरप्पा सरकार जबाबदार आहे.

महाराष्ट्रातील नद्यांचे पाणी पुढे सोडण्यासाठी 24 किंवा 48 तासाचा कालावधी लागतो मात्र असे असताना देखील भाजपा सरकारच्या निष्काळजीपणामुळे आज ही परिस्थिती उद्भवली आहे.  पाणी डोक्यावर आल्याने आता भाजपा सरकारचे डोळे उघडले असल्याची सणसणीत टीका राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांनी केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...