वारा आणि आभाळ बघून...,भाजप प्रवेशावर अमोल कोल्हेंचं सूचक विधान

गावगाडा
Updated Nov 25, 2022 | 19:14 IST

Amol Kolhe BJP : राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे भाजपमधील केंद्रीय नेत्यांच्या संपर्कात असल्याने ते राष्ट्रवादीवर नाराज असल्याचा दुजोरा मिळतोय. काहीच दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घेतलेली भेट देखील राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अनेकांना खुपली आहे. भाजप कार्यकर्ते मात्र अमोल कोल्हे यांचं स्वागत करत आहेत.

थोडं पण कामाचं
  • लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरू
  • अमोल कोल्हे भाजपमधील केंद्रीय नेत्यांच्या संपर्कात
  • राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिराला गैरहजेरी

पुणे : मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीवर नाराज आहेत. तसेच ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यात आता अमोल कोल्हे यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांवर सूचक वक्तव्य केले आहे. (Looking at the wind and the sky..., Amol Kolhe's suggestive statement on BJP entry)

अधिक वाचा : स्वतंत्र मराठवाड्याचा प्रश्न पेटला? उस्मानाबादेत गुणरत्न सदावर्तेचे पोस्टर फाडले

कोल्हे म्हणाले, मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, एक गोष्ट पक्की ठाऊक आहे की शेतकरी उगाच औत खांद्यावर घेऊन हिंडत नाही. वारा आणि आभाळ बघून गणित बांधायचं असतं आणि मग वावर नांगरायला घ्यायचं असते. 

भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. पक्षाचे प्राबल्य नसलेल्या किंवा मागच्या निवडणुकीत भाजपचा उमेदवार पराभूत झालेल्या मतदारसंघांवर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी भाजपने मिशन ४५ चे टार्गेट ठेवले आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील १६ मतदारसंघांची केंद्रीय मंत्र्यांकडे जबाबदारी दिली आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी प्रल्हादसिंग पटेल यांच्यावर त्यांनी काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हेही भाजपमध्ये आले तर स्वागतच आहे, असं सूचक विधान केलं होतं. 

अधिक वाचा : Konkan Raliway Updates : कोकणकन्या एक्सप्रेस तब्बल पाच तासांनी मार्गस्थ, पण मंत्र्यांच्या दौऱ्यांच गणित बिघडलं

काहीच दिवसांपूर्वी अमोल कोल्हे यांचा शिवप्रताप गरुडझेप हा चित्रपट प्रदर्शित झाला, यावेळी ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले. एककडे भाजपमधील केंद्रीय नेत्यांच्या संपर्कात असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरासाठी अमोल कोल्हे गैरहजर राहिल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाला दुजोरा मिळतोय.  त्यात आता गुजरात विधानसभा निवडणुकीच्या स्टार प्रचारक यादीतून अमोल कोल्हे यांचं नाव वगळण्यात आलं आहे, यानंतर अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सगळं काही आलबेल नसल्याच्या चर्चा आणखी वाढल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी