Maharashtra SSC Result 2020: दहावीचा ऑनलाइन निकाल इथे पाहा, या आहेत वेबसाइट

गावगाडा
रोहित गोळे
Updated Jul 29, 2020 | 11:37 IST

sscresult mkcl.org 2020: दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. ऑनलाइन निकालही आता जाहीर करण्यात आला आहे. यावेळी कोणकोणत्या वेबसाइटवर आपल्याला निकाल पाहता येईल याची माहिती आम्ही देत आहोत. 

SSC Result 2020 website link
दहावीचा ऑनलाइन निकाल इथे पाहा, या आहेत वेबसाइट  |  फोटो सौजन्य: Times Now

Maharashtra SSC Result 2020: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या 2020 परीक्षेचा निकाल (Maharashtra board SSC result 2020) आज (२९ जुलै २०२०) राज्याचा एकूण निकाल घोषित करण्यात आला आहे. यंदा संपूर्ण राज्याचा निकाल ९५.३० टक्के एवढा लागला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे. दहावीची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आपला निकाल MSBSHSE च्या अधिकृत वेबसाइटसह mahresult.nic.in, sscresult.mkcl.org या वेबसाइटवर पाहता येईल. तसंच अधिक माहितीसाठी विद्यार्थी MSBSHSE ची अधिकृत वेबसाइट देखील पाहू शकतात. 

दरम्यान, निकालाची तारीख जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र एसएससी निकाल २०२० ची लिंक अधिकृत वेबसाइटवर अॅक्टिव्हेट करण्यात आली आहे. बोर्डाने काल (२८ जुलै) दहावीच्या निकालाची तारीख आणि वेळ याची अधिकृत घोषणा केली होती. त्यानंतर आज दुपारी १ वाजता ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला. 

SSC Result 2020: या चार वेबसाइटवर पाहता येणार निकाल (List of Websites) 

mahresult.nic.in sscresult.mkcl.org
examresults.net indiaresults.com

SSC Result 2020 - कसा पाहाल mahresult.nic.in या वेबसाइटवर निकाल

  1. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ हे दहावी (SSC) या बोर्ड परीक्षांचे निकाल mahahsscboard.maharashtra.gov.in यावर जाहीर करतं. पाहा आपण नेमका निकाल कसा पाहू शकाल. 
  2. MSBSHSE ची अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा 
  3. Maharashtra SSC result 2020 लिंक आपल्याला मुख्य (होम) पेजवर दिसेल. त्यावर क्लिक करा. 
  4. त्यानंतर रिझल्ट पेज सुरु होईल
  5. इथे विद्यार्थ्यांना आपला सीट नंबर आणि आईचं नाव टाकायचं आहे. 
  6. ही माहिती भरुन सब्मिट बटण क्लिक करताच निकाल आपल्या स्क्रिनवर दिसू लागेल.

निकाल कसा पाहावा त्याचा खास व्हिडिओ: 

SMS द्वारेही पाहता येईल निकाल

विद्यार्थी एसएमएसद्वारे देखील दहावीचा निकाल पाहू शकतात. वरील वेबसाइटवर आपल्याला निकाल दिसत नसेल किंवा इंटरनेट नसेल तर एसएससी निकाल पाहण्याची ही सर्वात सोपी पद्धत म्हणजे SMS. एसएमएसद्वारे निकाल तपासण्यासाठी पुढील काही गोष्टीच कराव्या लागतील.

  • या स्वरुपात SMS टाइप करा: MHSSCSEAT NO
  • आता 57766 या क्रमांकावर पाठवा.
  • महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल SMS प्रमाणेच संबंधित मोबाइल नंबरवर पाठविला जातो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी