मुंबई : जतमधील ४० गावांचा मुद्दा पेटला असून कर्नाटक व महाराष्ट्राच्या बसेसना सीमाभागात काळे फासले जात आहे. त्यापार्श्वभूमीवर दोन्ही राज्यातील बस वाहतूक तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. आज बेंगलोर-पुणे महामार्गावर कर्नाटक भाषिकांनी आंदोलन केल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाला आहे. (Maharashtra-Karnataka Border Row: In Belgaum, Maharashtra cars were blackened, effigies of Shinde-Fadnavis were also burnt.)
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी चार दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील ४० गावे कर्नाटकमध्ये विलीन होणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर पुन्हा बोम्मई यांनी अक्कलकोट आणि सोलापूरही आमचाच भाग असल्याचे म्हटल्यानंतर कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही भाजप शासित राज्यांमध्ये संघर्ष उफाळून आला आहे.
अधिक वाचा : Mumbai Water Cut:अरे देवा! मुंबईत उद्या-परवा 24 तासांसाठी पाणीकपात, तुमच्या भागात काय असेल स्थिती?
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ४० गावांवरून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ विरोधपक्ष रस्त्यावर उतरला. राज्यात मागील दोन दिवसांत शिवसेनेच्यावतीने अनेक अनेक कर्नाटक स्टेट टान्सपोर्टच्या बसवर जय महाराष्ट्र लिहून आंदोलन करण्यात आले होते. दोन्ही राज्यांमध्ये तणाव निर्माण झाल्याने सीमाभागातील बससेवा बंद करण्यात आली.
आज कर्नाटकमध्येही बंगळुरू-पुणे महामार्गावर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी महाराष्ट्रातील वाहनांवर फासण्यात आले. तसेच कर्नाटकविरोधी रोषाला प्रोत्साहन दिल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन कर्नाटकमध्ये निषेध नोंदवला.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं विधान आणि दोन्ही राज्यातील भाषिकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे महाराष्ट्र-कर्नाटक या दोन्ही राज्यातील वातावरण तापलं आहे. महामार्गावरील आंदोलनानंतर दोन्ही राज्यांच्या सीमांवर बस सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांना याचा मोठा फटका बसला आहे.