Gulabrao Patil: आमदार गुलाबराव पाटील यांचं बंडखोरीबाबत मोठं विधान, सांगितला 'तो' किस्सा

गावगाडा
Updated Nov 20, 2022 | 12:44 IST

Gulabrao Patil: जळगावमध्ये एका कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजळा दिला आहे.

थोडं पण कामाचं
  • शिवसेनेचे कट्टर नेते असलेल्या एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंडखोरी केली.
  • जळगावमध्ये एका कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजळा दिला आहे.
  • आम्हाला पुन्हा निवडणुकीला सामोरं जावं लागलं असतं किंवा सरकार कोसळलं असतं, असं विधान गुलाबराव पाटलांनी केलं आहे.

जळगाव:  शिवसेनेचे कट्टर नेते असलेल्या एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंडखोरी केली. त्यानंतर शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं.
शिवसेनेते खिंडार पडल्यानंतर राज्यातलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर राज्यात सध्या शिंदे- फडणवीस सरकाराची सत्ता आहे. हे सरकार स्थापन होत असताना राज्यात बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या.या सर्व राजकीय नाट्यनंतर शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी बंडखोरीबाबत मोठं विधान केलं आहे. जळगावमध्ये एका कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजळा दिला आहे. 

अधिक वाचा- मुली शाळेत जात नव्हत्या, पालकांनी जाणून घेतले कारण तर सरकली पायाखालची जमीन

साधं सरपंचपद कोणी सोडत नाही, मात्र आम्ही 8 जणांनी मंत्रिपद सोडलं.मी भाजपावाल्यांना नेहमी बोलतो की, आम्ही सट्टा खेळून तुमच्याकडे आलोय.
आम्ही मंत्रिपद तर सोडलं होतं. मात्र जर आमची संख्या पूर्ण झाली नसती तर आम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली होती असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
सत्ता स्थापन करण्यासाठी आम्हाला 38 आमदारांची गरज होती. मी  33 वा होतो आणखी जर पाच आले नसते तर माझा कार्यक्रम आटोपला असता असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी