Mumbai Rape Case : व्हेंटिलेटरवर जीवन आणि मृत्यूशी झुंज देणाऱ्या निर्भयाचा मृत्यू

गावगाडा
Updated Sep 11, 2021 | 13:26 IST | नवभारत टाइम्स

मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेचा अति रक्तस्त्रावामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला. पीडितेचे बरेच रक्त गेले होते. डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नांनंतरही त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

 Death of Nirbhaya who fought life and death on a ventilator
Mumbai Rape Case : व्हेंटिलेटरवर जीवन आणि मृत्यूशी झुंज देणाऱ्या निर्भयाचा मृत्यू ।   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला
  • 30 वर्षीय महिलेसोबत बलात्कार झाल्याची घटना घडली
  • बलात्कारानंतर आरोपीने प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड घातल्याने जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे मृत्यू

मुंबई : साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेचा शनिवारी सकाळी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पीडितेला रुग्णालयात दाखल केले असता तिची प्रकृती चिंताजनक होती. बलात्कारानंतर आरोपीने गुप्तांगात रॉड घातल्याने तिच्या  शरीरातून बरेच रक्त वाहू लागले होते.  तिला  व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. डॉक्टरांनी खून प्रयत्न करुनही त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. (Mumbai Rape Case: Death of Nirbhaya who fought life and death on a ventilator)

या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. मुंबईतील साकीनाका परिसरात एका टेम्पोच्या आत 30 वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आला. साकीनाकाची ही घटना देशाची राजधानी दिल्लीत 2012 च्या 'निर्भया' घटनेची आठवण करून देते.

हृदय पिळवटून टाकणारी घटना

साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संबंधित पोलीस स्टेशनला दिले आहेत. ते म्हणाले की मी स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे आणि पोलिसांकडून प्रत्येक क्षणाचा अपडेट घेत आहे. दिलीप वळसे पाटील म्हणाले की साकीनाकाची घटना हृदय पिळवटून टाकणारी आणि दुर्दैवी आहे.

cctv फुटेज हाती

मुंबईतील साकीनाका परिसरात एका 30 वर्षीय महिलेवर झालेल्या बलात्काराच्या घटनेतील एक महत्त्वाचा सीसीटीव्ही समोर आला आहे. यामध्ये आरोपी पीडितेला रस्त्यात बेदम मारहाण करत असल्याचे दिसून येते. मारहाण केल्यानंतर तो पीडितेला एका टेम्पोमध्ये टाकून पळून जातो. हा सीसीटीव्ही रात्रीचा आहे, यामुळे चित्र फारसे स्पष्ट नाही.

आणखी काही संशयित पोलिसांच्या रडारवर

महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर समजल्या जाणाऱ्या मुंबईत महिला आता सर्वात असुरक्षित बनत आहेत. साकीनाका बलात्कार प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. या घटनेत आणखी आरोपींचा सहभाग असावा, असा पोलिसांना संशय आहे. सध्या या दिशेने तपास सुरू आहे.


पीडित महिला रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडलेली होती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना गुरुवारी रात्री साडेतीनच्या सुमारास नियंत्रण कक्षाला फोन आला की साकीनाका येथील खैराणी रोडवर एक महिला बेशुद्ध आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आहे. माहिती मिळताच साकीनाका पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पीडितेला मुंबईच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. जिथे त्या महिलेवर उपचार सुरू होते.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी