mumbai rape case : निर्भया प्रकरणाच्या जलद तपासासाठी एसआयटी चौकशी, मुंबई पोलिसांकडून महिला अधिकाऱ्याची नेमणूक

गावगाडा
Updated Sep 11, 2021 | 18:10 IST | टाइम्स नाऊ मराठी

साकीनाका येथे बलात्कार झालेल्या पिडीत महिलाचा घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अधिक प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाल्याची माहिती आहे.

mumbai rape case: SIT inquiry for speedy probe into Nirbhaya case, Mumbai Police appoints female officer
निर्भया प्रकरणाच्या जलद तपासासाठी एसआयटी चौकशी  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • साकीनाका बलात्कार प्रकरणाचा एसआयटी तपास करणार
  • गुन्ह्याच्या तपासकामी विविध पथके तयार
  • संशयित आरोपीला,बाहेरगावी पळुन जात असताना अटक

मुंबई : साकीनाका बलात्कार प्रकरणातील पिडितेचा शनिवारी सकाळी राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. आरोपीने बलात्कारानंतर महिलेल्या गुप्तांगात राॅड घातल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. अतिरक्तस्त्रावामुळे पिडीत महिलेचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास जलदगतीने व्हावा यासाठी मुंबई पोलिसांनी एसआयटीची स्थापन केली अजून महिला सहाय्यक पोलीस आयुक्त जोत्सना रासम यांची तपासासाठी नेमणूक करण्यात आली आहे. तसेच येत्या महिन्याभरात हा गुन्हा उघड करू, असे मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. (mumbai rape case: SIT inquiry for speedy probe into Nirbhaya case, Mumbai Police appoints female officer)

मुंबईतील साकीनाका परिसरात एका टेम्पोच्या आत 30 वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आला. बलात्कार केल्याने संशयित आरोपीने पिडीत महिलेल्या गुप्तांगात राॅड घातला. त्यानंतर ती जखमी अवस्थेत रस्त्याच्याकडेला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. ही निंदनीय घटना १० तारखेच्या रात्री घडली. साकीनाकाची ही घटना देशाची राजधानी दिल्लीत 2012 च्या 'निर्भया' घटनेची आठवण करून देते. याप्रकरणी आज मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेतली.

त्या रात्री नेमके काय घडले

या घटनेची माहिती सुरक्षा रक्षकाने पोलिस कंट्रोल रुमला ३ वाजून २० मिनिटांनी दिली. त्यानंतर तातडीने पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यापीडित महिला अत्यवस्थ होती. वेळ न दडवता तोच टेम्पो पोलिसांनी चालवून तात्काळ तीला उपचाराकरीता राजावाडी रुग्णालयात दाखल केले. गुप्तांगावर गंभीर जखमा झाल्याने अतिरक्तस्त्राव झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.  उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. यामुळे पीडित महिलेचा जबाब नोंदवता आला नाही. त्यामुळे नेमके काय घडले हे अद्याप सांगता येत नाही. मात्र लवकरच तपासात सर्व गोष्टी उघड होतील, असेही आयुक्त नगराळे यांनी सांगितले.

आरोपी बाहेरगाळी पळून जाण्याच्या तयारीत

या गुन्हयांच्या तपासकामी विविध पथके तयार करण्यात आली. घटनास्थळ परिसरातून सी.सी.टी.व्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये आरोपी एकच असल्याचे निष्पन्न झाला आहे. आरोपीची सी.सी.टी.व्ही फुटेज वरून ओळख पटवण्यात आली. तांत्रिक तपासाच्या आधारे व गुप्त माहितीदारांच्या माहिती वरून संशयित आरोपी नामे मोहन, रा. जौतपुर, उत्तर प्रदेश यांस बाहेरगावी पळून जात असताना त्यास अटक करण्यात आली आहे. आरोपी हा मिळेल त्याप्रमाणे खैरानी रोड परिसरात चालकांचे काम करीत असतो. तसेच काम न मिळाल्यास कचरा गोळा करत असतो. रस्त्यावरतीच झोपत असतो त्यास दारू पिण्याचे व्यसन आहे. 

एका महिनाभरात आरोपपत्र

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश दिले असून त्यादिशेने काम सुरू आहे. तपासासाठी
आयुक्‍त श्रीमती जोत्सना रासम यांचे अधिपत्याखाली विशेष तपास पथकाची नेमणुक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा योग्य दिशेने आणि जलदगतीने तपास व्हावा म्हणून एसआयटीची स्थापना केली असून येत्या महिनाभरात या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असे नगराळे यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी