'नाहीतर भारताचा पाकिस्तान झाला असता', राऊतांनी केलं नेहरुंचं कौतुक

गावगाडा
Updated Nov 19, 2022 | 17:58 IST

काँग्रेस नेते राहुल गांधींनी विनायक दामोदर सावरकरांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण बरंच तापलंय. त्यामुळे आता अनेक सावरकरप्रेमी हे थेट देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंवर टीका करतायेत

थोडं पण कामाचं
  • संजय राऊतांनी केलं पंडित नेहरुंचं कौतुक
  • 'नेहरु नसते तर भारताचा पाकिस्तान झाला असता'
  • 'सावरकर आणि नेहरु यांचं स्वातंत्र्य लढयात मोठं यश'

मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधींनी विनायक दामोदर सावरकरांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण बरंच तापलंय. त्यामुळे आता अनेक सावरकरप्रेमी हे थेट देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंवर टीका करतायेत (otherwise india would have become pakistan sanjay raut praised pandit nehru)

या संपूर्ण वादावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीये. ज्यावेळी त्यांनी सावरकर आणि नेहरु या दोन्ही नेत्यांचा देश घडवण्यात मोठा वाटा असल्याचं म्हटलंय. मात्र, यावेळी राऊत असंही म्हणाले की, नेहरुंनी हिंदुस्थानचा पाकिस्तान होऊ दिला नाही यासाठी त्यांचे आपण आभारच मानले पाहिजेत. 

संजय राऊतांनी पंडीत नेहरुंचं जे कौतुक केलं आहे त्यामुळे आता सावरकर प्रेमी यावर कशा पद्धतीने व्यक्त होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणारेये

राऊतांकडून वाद मिटविण्याचं आवाहन 

दरम्यान, संजय राऊत यांनी या सगळ्या वादात अगदी सामंजस्याची भूमिका घेतलीय. हा सगळा वाद मिटावावा असं आवाहनच राऊतांनी केलंय. फक्त पंडित नेहरु किंवा सावरकरच नव्हे तर महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, वल्लभभाई पटेल या नेत्यांचं देखील स्वातंत्र लढ्यात वेगळं स्थान होतं. त्यामुळे त्यांच्याबाबत आपण आदरच व्यक्त केला पाहिजे असंही राऊत म्हणालेत. 

एकीकडे संजय राऊत हा वाद अधिक वाढू नये यासाठी प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतंय. पण दुसरीकडे राहुल गांधींच्या वक्तव्याबाबत भाजप प्रचंड आक्रमक झालाय. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी राहुल गांधींविरोधात भाजपकडून जोरदार निदर्शनं केली जातायेत. तर दुसरीकडे राहुल गांधी मात्र आपल्या मतावर आणि वक्तव्यावर ठाम आहेत. 

अशावेळी आता संजय राऊतांनी दोन्ही बाजूंना केलेल्या आवाहनाला नेमका कसा प्रतिसाद मिळतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणारेय. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी