Congress: 'बाळासाहेबांची काँग्रेस' आणि 'नानांची काँग्रेस' काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील यांचं ट्वीट

गावगाडा
Pooja Vichare
Updated Feb 08, 2023 | 10:08 IST

काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानंतर स्थानिक पातळीवरील नेते देखील संभ्रमात पडले आहेत.'बाळासाहेबांची काँग्रेस' आणि 'नानांची काँग्रेस' ट्वीटमध्ये उल्लेख असं ट्वीट काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी केलं आहे.  

Congress
काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीबद्दल चर्चा 

Congress: नाशिक: काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानंतर स्थानिक पातळीवरील नेते देखील संभ्रमात पडले आहेत.'बाळासाहेबांची काँग्रेस' आणि 'नानांची काँग्रेस' ट्वीटमध्ये उल्लेख असं ट्वीट काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी केलं आहे.  ट्वीटनंतर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीबद्दल चर्चा सुरु असल्याच्या चर्चा होत आहेत.  काँग्रेस प्रवक्त्या पाटील ट्विट करत कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. विधानपरिषद निवडणुकांमध्ये सत्यजित तांबे प्रकरणावरून काँग्रेस अंतर्गत वादाला तोंड फुटले. नाशिक पदवीधर निवडणुकीदरम्यान काँग्रेस पक्षात दोन गट निर्माण झाले आहेत. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आता दोन गट पडल्याचं स्पष्टच झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शांत असलेले काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात हायकमांडकडे तक्रार केली. त्यानंतर दोन दिग्गज नेत्यांमधील वाद चव्हाटयावर आल्याचं चित्र आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी