Sunil Tatkare | महाराष्ट्रातला महत्वाकांक्षी प्रकल्प पुन्हा सुरू करणार?; सुनील तटकरे PM मोदींची भेट घेणार

Sunil Tatkare : रत्नागिरी पाॅवर अँण्ड गॅस प्रकल्पातून वीज निर्मीती बंद आहे. हा प्रकल्प सुरु करण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेणार असल्याची त्यांनी माहिती खासदार सुनिल तटकरे यांनी माहिती दिली.

Prime Minister will meet Modi regarding projects in Konkan
RGPPL Project: ...म्हणून महाराष्ट्रात उद्योग येत नाहीत, सुनिल तटकरे घेणार पंतप्रधानांची भेट ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • रत्नागिरी पाॅवर अँण्ड गॅस प्रकल्पातून वीज निर्मीती बंद
  • प्रकल्पाचा सुनील तटकरेंनी घेतला आढावा
  • प्रकल्पासाठी मोदींची भेट घेणार

रत्नागिरी (सचिन कांबळे) : महाराष्ट्रात येणार चार मोठे उद्योग प्रकल्प इतर राज्यात गेल्याने राज्यातील राजकारण तापले असताना राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी आज रत्नागिरीतील बंद असलेल्या रत्नागिरी पाॅवर अँण्ड गॅस (RGPPL) प्रकल्पाला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रकल्प सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या माध्यमातून पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचे सांगितले. (Prime Minister will meet Modi regarding projects in Konkan)

अधिक वाचा : Accident News उस्मानाबादमध्ये विचित्र अपघात, आयशरने दिली मागून दिली धडक आणि.......

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकाराने रत्नागिरीत सुरू करण्यात आलेला वीजनिर्मिती प्रकल्पामुळे १९९५ साली राजकारण तापले. त्यानंतर सत्तेवर आलेल्या शिवसेना-भाजप युतीच्या काळात या प्रकल्पाला गती मिळाली. गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस आणि वीजनिर्मिती प्रकल्प (दाभोळ प्रकल्प) बंद आहे. तो पुन्हा सुरू करण्यासाठी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी आढावा घेतला. तसेच यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करावा लागणार आहे. यासाठी शरद पवार यांच्यासोबत ते मोदींची भेट देणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी