Shivsena Protest| राज्यपालांच्या वक्तव्याचा शिवसेनेकडून निषेध, अंबादास दानवेंच्या नेतृत्त्वात आंदोलन

गावगाडा
Updated Nov 21, 2022 | 14:34 IST

Shiv Sena: छत्रपती शिवरायांचं अपमान केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात शिवसेनेनं आंदोलन केलं. आज शिवसेना दक्षिण मुंबईच्या वतीने गिरगाव चौपाटी येथील शिवसेना शाखेजवळ हे आंदोलन करण्यात आलं.

थोडं पण कामाचं
  • विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे.
  • शिवसेना नेते संजय राऊत यांनी या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
  • राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यात वादंग उभे राहिले आहे.

मुंबई:  Protest by Shiv Sena:  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यात वादंग उभे राहिले आहे. विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे.  राज्यपालांविरोधात शिवसेनेनं आंदोलन केलं आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आलं.


छत्रपती शिवरायांचं अपमान केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात शिवसेनेनं आंदोलन केलं. आज शिवसेना दक्षिण मुंबईच्या वतीने गिरगाव चौपाटी येथील शिवसेना शाखेजवळ हे आंदोलन करण्यात आलं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन झालं. यावेळी पोलिसांनी दानवे यांच्यासह शिवसैनिकांना ताब्यात घेतले.यावेळी विभागप्रमुख पांडुरंग सपकाळ, शाखाप्रमुख व महिला आघाडीच्या पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी