sambhaji brigade protest in shri shri ravishankar program in tuljapur osmanabad : उस्मानाबाद : श्री श्री रविशंकर यांचा उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे 'जागर भक्तीचा ' कार्यक्रम होता. या कार्यक्रमात सभांजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि श्री श्री रविशंकर यांना काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध केला.
काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबाबत श्री श्री रविशंकर यांनी एक वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर आक्षेप घेत संभाजी ब्रिगेडने श्री श्री रविशंकर यांच्या विरोधात आंदोलन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री श्री रविशंकर यांनी संभाजी ब्रिगेडला शांततेचे आवाहन केले. इतिहासकारांच्या वेगवेगळ्या लिखाणामुळे काही गोंधळ निर्माण झाले आहेत. शांतपणे चर्चा करून हे वाद सोडवणे शक्य आहे. आपण मिळून काम करू. इतिहास, संस्कृती याबाबत जनजागृती करू; असा प्रेमाचा सल्ला श्री श्री रविशंकर यांनी संभाजी ब्रिगेडला दिला.