नंदूरबाद (दिनू गावित) : नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा येथे रासायनिक खताच्या भेसळीचा धंदा सुरु असल्याची बातमी सर्वात प्रथम टाइम्स नाऊ मराठीने दाखवली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. जिल्हा कृषी विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्या रासायनिक खताच्या दुकानाचा परवाना कायम स्वरुपी रद्द केला आहे. (Sealing of shop adulterating in chemical fertilisers)
अधिक वाचा : महाराष्ट्र दौऱ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मिळाले स्पेशल गिफ्ट
नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा येथील न्यू कृषी सेवा केंद्रामध्ये रासायनिक खतांची भेसळ केली जात होती. त्यासंदर्भात टाइम्स नाऊने बातमी दाखवली होती. त्यानंतर नंदुरबार जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत सदस्य भरत गावित, कृषी सभापती हेमलता शितोळे यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर जिल्हा कृषी अधीक्षक निलेश भार्गेश्वर व जिल्हा परिषद कृषी अधिकारी पंकज खरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कृषी सेवा केंद्राची चौकशी करण्यात आल्याची माहिती दिली.
अधिक वाचा : Mumbai Pollution : मुंबई प्रदूषणाच्या विळख्यात, दिल्लीपेक्षा परिस्थिती वाईट
कृषी अधीक्षक व जिल्हा परिषद कृषी विभाग यांच्यासह १२ अधिकाऱ्यांची टीमने घटनास्थळी पंचनामा केला. त्यानंतर संबंधित कृषी सेवा केंद्राचा परवाना कायम स्वरुपाचा रद्द करण्यात आला आहे. तसेच त्यांच्याकडे उपलब्ध सर्व खत साठा आजच जप्त करण्यात आला आहे.