Chitra Wagh | 'हा हरामखोर' नाशिकच्या अत्याचाराच्या घटनेवर चित्रा वाघ संतापल्या, VIDEO

गावगाडा
Updated Nov 25, 2022 | 12:13 IST

Nashik crime : नाशिकमधील आधार आश्रम चालवणाऱ्या संचालकानेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

नाशिक : नाशिकमध्ये एका संतापजनक घटना समोर आली आहे. हाॅस्टेलमध्ये संस्थाचालकाने एका अल्पवयीन मुलीला आपल्या रुममध्ये बोलवून हात पाय दाबायला सांगून मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ तिला बघायला लावून लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली. (See what exactly Chitra Vagh said after the Nashik incident)

अधिक वाचा : वारा आणि आभाळ बघून...,भाजप प्रवेशावर अमोल कोल्हेंचं सूचक विधान

नाशिक येथील द किंग फाउंडेशनने ज्ञानपीठ गुरुकुल आधार आश्रमात गरीब कुटुंबातील मुला - मुलींची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दानशूर लोकांकडून देणगी गोळा करून हाॅस्टेल चालवले जाते. त्या मुलांना परिसरातील शाळांमध्ये प्रवेशही दिला जातो. 

हाॅस्टेल चालक हर्षल बाळकृष्ण मोरे (३२, रा.म्हसरूळ, नाशिक)  याने मागील आठवड्यामध्ये आदिवासी पाड्यावरील चौदा वर्षीय मुलीवर हाॅस्टेलमधून काढून टाकण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केले. या घटनेनंतर नाशिकच्या म्हसरूळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मोरेला अटक करण्यात आली आहे.  या घटनेनंतर भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. 

अधिक वाचा : स्वतंत्र मराठवाड्याचा प्रश्न पेटला? उस्मानाबादेत गुणरत्न सदावर्तेचे पोस्टर फाडले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्यातील सर्व आधार आश्रमांचे ऑडिट व्हावे. किती आधार आश्रम नोंदणीकृत आहेत आणि किती बेकायदेशीर रीत्या चालवले जाताहेत हे उजेडात आलेच पाहिजे, अशी मागणी केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी