Sanjay Raut: ''राज्यपालांना हटवा, अन्यथा...'', शिवसेना नेते संजय राऊतांचा इशारा

गावगाडा
Updated Nov 21, 2022 | 14:52 IST

Sanjay Raut: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यात वादंग उभे राहिले आहे. विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे.

थोडं पण कामाचं
  • राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यात वादंग उभे राहिले आहे.
  • विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे.
  • शिवसेना नेते संजय राऊत यांनी या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

मुंबई: Sanjay Raut:  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यात वादंग उभे राहिले आहे.
विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांना हटवण्याची मागणी महाराष्ट्र शासनाकडून अधिकृतपणे केली पाहिजे. दळभद्री राज्यपालांना हटवा, अन्यथा जोडे काय असतात आणि ते कसे मारले जातात हे शिवसेना दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी भाजपचा निषेध केला पाहिजे, असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे. संजय राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा अत्यंत दळभद्री विधान केले आहे. यामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा एकदा दुखावला गेला असल्याचंही संजय राऊत म्हणालेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी