Nashik: शिवशाही पेटली, नाशिकध्ये पुन्हा बर्निंग बसचा थरार; 45 प्रवासी बचावले

गावगाडा
Updated Nov 02, 2022 | 14:33 IST

Shivshahi Bus fire: नाशिक पुणे महामार्गावर महामंडळाच्या शिवशाही बसला (Shivshahi Bus)आग लागली. सुदैवाने बसमधील 45 प्रवाशांना बसबाहेर काढण्यात चालकाला यश आले.

थोडं पण कामाचं
  • नाशिकमध्ये पुन्हा एकदा बर्निंग बसचा (Nashik Accident) थरार पाहायला मिळाला आहे.
  • सुदैवाने बसमधील 45 प्रवाशांना बसबाहेर काढण्यात चालकाला यश आले.
  • थोडक्यात मोठा अनर्थ टळला. मात्र संपूर्ण बस जळून खाक झाली.

सिन्नर: Nashik Bus Accident: नाशिकमध्ये पुन्हा एकदा बर्निंग बसचा (Nashik Accident) थरार पाहायला मिळाला आहे. नाशिक पुणे महामार्गावर महामंडळाच्या शिवशाही बसला (Shivshahi Bus)आग लागली. सुदैवाने बसमधील 45 प्रवाशांना बसबाहेर काढण्यात चालकाला यश आले. त्यामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळला. मात्र संपूर्ण बस जळून खाक झाली.

नाशिक-पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात आज सकाळी 7.30 च्या सुमारास द बर्निग बसचा थरार बघायला मिळाला.  नाशिकहून पुण्याच्या दिशेने शिवशाही क्रमांक एम. एच. 06/ बी डब्ल्यू 0640 जात होती. त्यावेळी माळवाडी येथे अचानक बसच्या पाठीमागील बाजूने पेट घेतला. त्याचवेळी गाडीच्या पाठीमागच्या बाजूला धूर निघत असल्याचं चालकाच्या लक्षात आले.  

अधिक वाचा-  ट्विटरच्या ब्लू टिकसाठी मस्क यांची मोठी घोषणा, आता मोजा इतके पैसे

चालकानं प्रसंगावधान राखत बसमधल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं.  यानंतर गाडीने मोठ्या प्रमाणात पेट घेतला. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी सिन्नर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या. काही वेळानंतर अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं. 

थोडक्यात मोठ्या दुर्घटनेतून बचावल्यामुळे बसमधील सर्व प्रवाशाांनी सुटकेचा निश्वास सोडला. शॉर्ट सर्किटमुळे या बसला आग लागली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आग कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. आगीमुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यानंतर महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी