Solapur: आई राजा उदो उदो...! तुळजाभवानी देवीचे सीमोल्लंघन उत्साहात पार

गावगाडा
Updated Oct 05, 2022 | 14:12 IST

Solapur: देवीची मूर्ती पालखीत ठेवून देवीचं मंदिराबाहेर भाविकांना येऊन दर्शन घेता येते. गुलाल आणि फुलांच्या उधळण आणि आई राजा उदो उदोच्या जयघोषाने दसरा साजरा केला. महिषासुर दैत्यासोबत गेली नऊ दिवस देवी युद्ध खेळत होती.

थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा दसरा म्हणजे सीमोल्लंघन सोहळा आज पहाटे मोठ्या उत्साहात पार पडला.
  • गेली नऊ दिवस तुळजाभवानी देवीचे नवरात्रौत्सवात अलंकार पूजा करण्यात आल्या.
  • त्यानंतर देवीचा मुख्य उत्सव म्हणजे दसरा पार पडला.

सोलापूर: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा दसरा म्हणजे  सीमोल्लंघन सोहळा आज पहाटे मोठ्या उत्साहात पार पडला. गेली नऊ दिवस तुळजाभवानी देवीचे नवरात्रौत्सवात अलंकार पूजा करण्यात आल्या. त्यानंतर देवीचा मुख्य उत्सव म्हणजे दसरा पार पडला.

देवीची मूर्ती पालखीत ठेवून देवीचं मंदिराबाहेर भाविकांना येऊन दर्शन घेता येते. गुलाल आणि फुलांच्या उधळण आणि आई राजा उदो उदोच्या जयघोषाने दसरा साजरा केला. महिषासुर दैत्यासोबत गेली नऊ दिवस देवी युद्ध खेळत होती. महिषासुर दैत्याचा देवीने वध केल्यानंतर साजरा होणारा विजय उत्सव म्हणजे दसरा अशी आख्यायिका सांगितली जाते.

अधिक वाचा-  दसरा मेळाव्यासाठी 'हे' रस्ते बंद राहणार, या पर्यायी मार्गावरून करा प्रवास

तुळजाभवानी देवीची मूर्ती चल मूर्ती असून देवीला आज आपल्या सिंहासनावरुन बाहेर आणली जाते. यावेळी देवीच्या मुर्तीला एकशे आठ साड्या गुंडाळून देवीचे माहेर असलेल्या अहमदनगर येथून मानाच्या पालखीतून देवीची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते.

देवीची मूर्ती बाहेर काढल्यानंतर मंदिर परीसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. देवीचा हा उत्सव पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती . तुळजाभवानी देवी पौर्णिमापर्यंत निद्रासाठी गेल्याने देवीचा गाभारा रिकामा असतो आणि भाविक या गाभाऱ्याचे दर्शन घेतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी